पुणे महापालिका निवडणुक: आरक्षण सोडत पूर्ण; १७३ जागांपैकी ८७ जागा महिलांसाठी राखीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 02:38 PM2022-07-29T14:38:58+5:302022-07-29T14:43:45+5:30

ओबीसीकरिता ४६ जागा निश्चित...

Pune Municipal Elections Allotment of Reservation Completed; Out of 173 seats, 87 seats are reserved for women | पुणे महापालिका निवडणुक: आरक्षण सोडत पूर्ण; १७३ जागांपैकी ८७ जागा महिलांसाठी राखीव

पुणे महापालिका निवडणुक: आरक्षण सोडत पूर्ण; १७३ जागांपैकी ८७ जागा महिलांसाठी राखीव

googlenewsNext

पुणे : महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठी महिला आरक्षणासह ओबीसी एसटी एसीच्या जागा अंतिम झाल्या आहेत. यानुसार १७३ जागांपैकी ८७ जागा या महिलांसाठी राखीव झाल्या असून, ओबीसी करिता ४६ जागा निश्चित झाल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार ओबीसी ( नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) आरक्षणाची सोडत आज काढली. हे करताना पूर्वीच्या महिला आरक्षणाची सोडत ही पुन्हा काढण्यात आली. ओबीसी आरक्षणामुळे खुल्या गटातील व विद्यमान नगरसेवकांना फटका बसण्याची शक्यता होती. मात्र प्रत्येक प्रभागात एक खुल्या गटासाठी जागा असल्याने दिग्गजांनी निवडणूक रिगणात उतरता येणार असून, केवळ नव्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांना याचा फटका बसल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

महापालिकेच्या १७३ जागांपैकी ओबीसी च्या ४६ जागांचे आरक्षण निश्चित करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती (महिला) यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने या आरक्षणात कोणताही बदल झालेला नाही. परंतु खुल्या गटातील महिला आरक्षण बदलले गेले आहे.

आरक्षित जागा तपशील खालीलप्रमाणे :- 
१.    अनुसूचित जाती जमाती :- एकूण जागा २३ महिला :    १२
२.    अनुसूचित जमाती :- एकूण जग ०२ महिला :    ०१
३.    नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) :- एकूण जागा     ४६    महिला : २३
४.    सर्वसाधारण (ओपन) :- एकूण जागा : १०२    महिला : ५१
सर्व मिळून एकूण    जागा :-  १७३
महिला :    ८७

 

Web Title: Pune Municipal Elections Allotment of Reservation Completed; Out of 173 seats, 87 seats are reserved for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.