पुण्यातील कर्वे रस्ता मोकळा श्वास घेणार; दुहेरी उड्डाणपुलाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उदघाटन होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 04:22 PM2022-03-09T16:22:59+5:302022-03-09T16:23:31+5:30

दुमजली उड्डाणपुलामुळे डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला या उड्डाणपुलामुळे चांगलीच गती मिळणार आहे

Pune Nalstop double flyover to open It will be inaugurated by Devendra Fadnavis | पुण्यातील कर्वे रस्ता मोकळा श्वास घेणार; दुहेरी उड्डाणपुलाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उदघाटन होणार

पुण्यातील कर्वे रस्ता मोकळा श्वास घेणार; दुहेरी उड्डाणपुलाचे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उदघाटन होणार

Next

पुणे : पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे उदघाटन येत्या रविवारी १३ तारखेला संध्याकाळी ६ वाजता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे आता कर्वे रस्ता वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे. मेट्रोकडून हा पूल महापालिकेच्या ताब्यात आल्यावर पुलाच्या विद्युत व्यवस्थेचेही काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे असताना महापालिकेच्या २०१७-१८ अंदाजपत्रकात या उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी महापौर मोहोळ यांनी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपूर येथील साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना महापौर मोहोळ यांनी मांडली होती. 

दुमजली उड्डाणपुलाच्या उदघाटनाबाबत मोहोळ म्हणाले, 'डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला या उड्डाणपुलामुळे चांगलीच गती मिळणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला ३५ ते ४० हजार वाहने जा-ये करत असल्याची नोंद होती. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. त्यासाठी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला. आता हा प्रकल्प सिद्धीस गेला आहे. नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असून याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे आपला कल होता आणि त्या दृष्टीने यशदेखील आले आहे. कोरोनाचे संकट असतानाही मेट्रोने हे काम वेगाने पूर्ण केले त्याबद्दल मेट्रोचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद.

Web Title: Pune Nalstop double flyover to open It will be inaugurated by Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.