पुण्यात नारायणगावकरांनी अनुभवला अपघातानंतर विनाचालक बुलेटचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 13:29 IST2021-08-12T13:28:59+5:302021-08-12T13:29:06+5:30
बुलेट चालकविना पुढे सुसाट वेगाने रस्त्यावरून पलीकडे सुमारे २०० मीटर पुढे सुसाट वेगाने गेली

पुण्यात नारायणगावकरांनी अनुभवला अपघातानंतर विनाचालक बुलेटचा थरार
नारायणगाव : पुणे - नाशिक महामार्गावरील जयहिंद पॅलेस समोर जाणाऱ्या बुलेट चालकाने रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकी चालकाला जोराने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र अपघाता नंतर विनाचालक बुलेट काही अंतर गेल्याचा अनुभव नारायणगावकरांनी प्रत्यक्ष पहिला .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , मंगळवारी सायंकाळी ६. ३० वा सुमारास जयहिंद पॅलेस समोर आळेफाटा दिशेने भरघाव वेगाने जाणाऱ्या बुलेट वरील चालक मनीषा तलवार यांनी कामावरून घरी जात होत्या. एका दुचाकी चालकाने तलवार यांच्या दुचाकीला जोराने धडक दिली. तेव्हा गांजवे यांना मनगट ,मांडी व पंजाला गंभीर दुखापत झाली. तेथे असणाऱ्या नागरिकांनी त्यांना भोसले हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.
धडक दिल्यानंतर मनीष तलवार हा बुलेट वरून खाली पडल्या. मात्र व बुलेट चालकविना पुढे सुसाट वेगाने रस्त्यावरून पलीकडे सुमारे २०० मीटर पुढे सुसाट वेगाने गेली . हा प्रकार एका सीसी टीव्ही मध्ये कैद झाला होता. ती व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियावर फिरत होता. या अपघाताबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद घेण्याचे काम सुरु आहे अशी माहिती ठाणे अंमलदार पी. डी. मोहरे यांनी दिली.