पुणे - नाशिक बाह्यवळण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:10 AM2021-03-31T04:10:40+5:302021-03-31T04:10:40+5:30

बाह्यवळण पूर्ण झाल्यानंतर पुण्यावरून नाशिककडे जाणाऱ्या, तसेच नाशिकवरून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी या बाह्यवळण रस्त्याची मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर ...

Pune - Nashik bypass blocked | पुणे - नाशिक बाह्यवळण रखडले

पुणे - नाशिक बाह्यवळण रखडले

googlenewsNext

बाह्यवळण पूर्ण झाल्यानंतर पुण्यावरून नाशिककडे जाणाऱ्या, तसेच नाशिकवरून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी या बाह्यवळण रस्त्याची मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडी समस्या कायमची सुटणार आहे.

राजगुरुनगर, चांडोली होलेवाडी, ढोरे भांबुरवाडी व राक्षेवाडी या गावातील १०१ शेतकऱ्यांचे मिळून २३.३९ हेक्टर क्षेत्र बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी संपादित झाली आहे. चांडोली येथील कांदा लसून संशोधन केंद्राची १.२२ हेक्टर जागेच्या संपादनाचा विषय मिटला आहे.

राजगुरुनगर शहराच्या बाहेरील बाह्यवळण रस्त्याचे काम गेल्या ३ महिन्यांपासून सुरू असून संपादित क्षेत्रातून यात्रिकांद्वारे रस्त्याचे काम आहे. भीमानदीपात्रावरील पुलाच्या कामास ही सुरूवात झाली आहे. त्यामुळे येत्या दीड दोन वर्षात रस्त्याचे काम पूर्ण होण्याची नागरिकांना आशा आहे. शहराबाहेरील बाह्यवळण पूर्ण झाल्यानंतर राजगुरुनगर शहरातील वाहतूककोंडी सुटून वेळेची तर बचत होणारच आहे. मात्र अपघाताचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. खेड घाटातील बाह्यवळणाचे काम अजुनही अर्धवट अवस्थेत आहे. वाहतुकीसाठी रस्त्याची एक लेन सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूची लेन तयार झाली आहे. मात्र लेन लगतच मोठमोठ्या धोकादायक दरडी आहे. हे दरडी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या पुण्यावरुन येणारी वाहने जुन्या घाटामार्गे पुढे जातात, नाशिकवरून येणारी वाहने नवीन घाटाने येतात.

--

फोटो क्रमांक : राजगुरूनगर पुणे-नाशिक रोड

फोटो ओळ: राजगुरुनगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

Web Title: Pune - Nashik bypass blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.