पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे खर्च मोठा; पण तरतूद काही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:19+5:302021-03-09T04:14:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देऊन राज्याच्या अर्थसंकल्पात बजेट हेड ओपन करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात निधी उपलब्ध होऊन प्रकल्पाचे काम सुरू होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात २३५ किलो मीटर लांबीच्या पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी व २०० किलो मीटर स्पीडच्या रेल्वे प्रकल्पासाठी १६ कोटी ३९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पण तरदूत मात्र काहीच न केल्याने अपेक्षा भंग झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेला पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग आता खऱ्या अर्थाने रुळावर येण्याची तयारी सुरू झाली आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील सुमारे १४७० हेक्टर जमीन संपादित करणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यातील हवेली, खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील ५७५ हेक्टर जमीन संपादित करणार आहे. भूसंपादना संदर्भात रेल्वे विभागाकडून प्रस्ताव दाखल झाले आहेत. या ५७५ हेक्टर जमिनीसाठी १२०० ते १५०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. परंतु, भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध नसल्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही. आता बजेट हेड सुरू झाल्याने भूसंपादनासाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
---
प्रकल्पाची वैशिष्टय़े
* रेल्वेचा वेग प्रतितास २०० कि.मी.
* १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भुयारी मार्ग
* विद्युतीकरणासह एकाच वेळी दुहेरी रेल्वे मार्गाचे काम
* ६० टक्के वित्तीय संस्था, राज्य सरकार आणि रेल्वे प्रत्येकी २० टक्के खर्चाचा वाटा
------
असा असल प्रकल्प
- २३५किलोमीटर अंतर
- १३००हेक्टर-भूसंपादन
- १६००हजार ३९ कोटी-प्रकल्पाचा खर्च
- ९,६२४कोटी बँक कर्ज
- राज्य व रेल्वे मंत्रालयाचा हिस्सा प्रत्येकी-३२०८ कोटी