Accident: पुणे - नाशिक महामार्गावर पुलावरून कार खाली कोसळली; ५ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 16:35 IST2021-12-08T16:35:09+5:302021-12-08T16:35:29+5:30
सकाळी धुके असल्याने चालकाला पुलाचा कठडा न दिसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Accident: पुणे - नाशिक महामार्गावर पुलावरून कार खाली कोसळली; ५ जण गंभीर जखमी
नारायणगाव : पुणे - नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ झालेल्या अपघातात मारुती कार पोटचारीवरील पुलावरून कोसळून पुण्यातील ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. रोहन लहाडे, विशाल उबाळे, प्रतिक जाधव, राजकुमार जयस्वाल, गोकुळ जाधव (रा. वाकड पुणे ) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
संगमनेरहून पुण्याच्या दिशेने कार जात असताना हॉटेल राज वैभव जवळ बुधवारी पहाटे ६ वाजता कार पोटचारी वरील पुलाच्या कठड्याला धडकून खाली कोसळून अपघात झाला. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहेत. सकाळी धुके असल्याने चालकाला पुलाचा कठडा न दिसल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.