corona virus ; आता चेहऱ्यापर्यंत पोचणारच नाही कोरोना विषाणू ; पुण्यातील संस्थेचे संशोधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 03:05 PM2020-04-04T15:05:53+5:302020-04-04T15:10:48+5:30
एकीकडे देशभर कोरोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या एक्युबेशन सेंटरने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या आणि थेट कोरोनाबाधित व संशयित व्यक्तींशी संपर्क येणाऱ्या व्यक्तींसाठी फेस शिल्ड बनवले आहे.
पुणे : एकीकडे देशभर कोरोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या एक्युबेशन सेंटरने सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या आणि थेट कोरोनाबाधित व संशयित व्यक्तींशी संपर्क येणाऱ्या व्यक्तींसाठी फेस शिल्ड बनवले आहे. त्यामुळे कोरोनाचे विषाणू संबंधित व्यक्तीपर्यंत पोचणार नसल्याचे सांगितले जात आहे.
कोरोना विषाणूने जगातील अनेक देशात प्रवेश केला असून हजारो लोक त्यामुळे मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना विषाणू हवेवाटे पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिंकल्यावर, खोकल्यावर तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधण्याचा सल्ला दिला जातो. वारंवार चेहऱ्याला हात न लावण्याच्या सूचनाही तज्ज्ञांनी दिल्या आहेत. त्यातच मास्कने फक्त तोंडाला संरक्षण मिळते.त्यामुळे बाकी चेहऱ्याच्या भागाला संरक्षण मिळावे म्हणून फेस शिल्ड बनवण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण चेहऱ्याचे संरक्षण होणार आहे.
व्यवस्थापिका डॉ मनीषा प्रेमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शिल्ड पाच दिवस टिकते. हे शिल्ड पोलीस, डॉक्टर आणि वैद्यकीय सहाय्यकांना मोफत वाटप करण्यात येत असून त्यामुळे त्यांचे विषाणूंपासून संरक्षण होणार आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचा भाग कव्हर होणार असून त्यावर कोरोना विषाणू प्रवेश करू शकणार नाहीत. हे शिल्ड कमीत कमी खर्चात आणि दिवसात बनविण्याचे आवाहन समोर होते असेही त्यांनी सांगितले.