पुण्याला गरज ९६ लाख लसींची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:15 AM2021-01-16T04:15:10+5:302021-01-16T04:15:10+5:30
=== शहराची लोकसंख्या ४४ लाख असून, प्रत्येक नागरिकास दोन डोस, याप्रमाणे ९६ लाख डोसची आवश्यकता आहे. याकरिता १०० ...
===
शहराची लोकसंख्या ४४ लाख असून, प्रत्येक नागरिकास दोन डोस, याप्रमाणे ९६ लाख डोसची आवश्यकता आहे. याकरिता १०० केंद्र आणि ५०० बुथचे नियोजन केले जाणार आहे. या १०० केंद्रांच्या जागेची निवड करण्यात आलेली आहे.
===
ही आहेत लसीकरणाची ठिकाणे
1. कै.जयाबाई नानासाहेब सुतार प्रसूतिगृह, कोथरूड
2. कमला नेहरू रुग्णालय, सोमवार पेठ
3. राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
4. ससून सर्वोपचार रुग्णालय
5. रुबी हॉल क्लिनिक, नगर रस्ता
6. नोबल हॉस्पिटल, हडपसर
7. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
8. भारती हॉस्पिटल, कात्रज
===
लसीकरणाचा प्राधान्यक्रम
१. वैद्यकीय सेवा देणारे सेवक
२. अत्यावश्यक सेवा देणारे सेवक (उदा. पोलीस, पालिका, शासकीय यंत्रणा आदी.)
३. ५० वर्षांच्या वरील व्यक्ती व व्याधीग्रस्त
४. सर्वसामान्य निरोगी व्यक्ती
====
* नोंदणीकृत लाभार्थ्यांनाच मिळणार लस
* लसीकरण केंद्रावर कोणतीही नोंदणी होणार नाही.
* नागरिकांनी केंद्रांवर गर्दी करू नये.