खंडोबा मंदिराच्या पायरीवर आढळले 4 तासांपूर्वी जन्मलेलं बाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 10:42 AM2018-10-12T10:42:01+5:302018-10-12T10:45:05+5:30
खंडोबा मंदिराच्या पायऱ्यांवर पहाटे ५.३० वाजता नुकतेच जन्मलेले बाळ सापडले आहे. खेड तालुक्यातील दावडी खरपुडी (खुर्द ) येथील शुक्रवारी (12 ऑक्टोबर) पहाटेची ही घटना आहे.
खेड (पुणे) - खंडोबा मंदिराच्या पायऱ्यांवर पहाटे ५.३० वाजता नुकतेच जन्मलेले बाळ सापडले आहे. खेड तालुक्यातील दावडी खरपुडी (खुर्द ) येथील शुक्रवारी (12 ऑक्टोबर) पहाटेची ही घटना आहे. स्थानिकांच्या मदतीनं या बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खंडोबा मंदिरातील पुजारी राजेश गाडे नेहमीप्रमाणे पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास डोंगरावर असणाऱ्या खंडोबा देवाची पूजा करण्यासाठी जात होते. यावेळेस त्यांना खंडोबा मंदिरालगत असणाऱ्या पीर देवाच्या पायऱ्यांवर बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला.
बॅटरीच्या उजेडात पाहिले असता त्यांना लहान बाळ विवस्त्र अवस्थेत आढळून आले. त्यांनी तातडीने देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष काकासाहेब गाडेंना घटनेची माहिती दिली. यानंतर तातडीने 108 मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून डॉक्टरांना घटनास्थळी बोलावण्यात आले. डॉ प्रमोद वाडेकर यांनी तातडीने लहान अर्भकावर प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळेस हे बाळ बेवारस अवस्थेत सापडले तेव्हा ते केवळ 4 तासांचे होते.