जलसंपदाच्या निविदेची होळी, जलसंपदा राज्यमंत्र्यांनी फसवणूक केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:35 AM2019-02-08T00:35:29+5:302019-02-08T00:35:52+5:30
गुंजवणीच्या बंद जलवाहिनीच्या कामाची निविदा काढून भोर, वेल्हा व हवेली तालुक्यातील योजनांचा उल्लेख करणे टाळल्याने या तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नसरापूर - गुंजवणीच्या बंद जलवाहिनीच्या कामाची निविदा काढून भोर, वेल्हा व हवेली तालुक्यातील योजनांचा उल्लेख करणे टाळल्याने या तीनही तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यामुळे जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या निविदेची गुंजवणी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी कापूरहोळ (ता.भोर) येथे होळी करण्यात आली. या वेळी शेतकºयांनी शासनाच्या विरोधी घोषणा दिल्या.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या चर्चेच्या वेळी माननीय मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री आदी अधिकाºयांनी गुंजवणीच्या सर्वच योजनांची निविदाही एकाच वेळी काढल्या जातील, असा शब्द दिला होता; मात्र नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निविदेच्या माध्यमातून फक्त आणि फक्त पुरंदर उपसा सिंचन योजनेची जवळपास १ हजार १६ कोटी रुपयांच्या निविदेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या चाललेल्या दडपशाहीचा भोर, वेल्हा व हवेली गुंजवणी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत, असे सर्व पक्षीय पदाधिकाºयांच्या वतीने आमदार संग्राम थोपटे यांनी कडक शब्दांत निषेध नोंदविला.
कापूरव्होळ (ता.भोर) येथे गुंजवणी संघर्ष समितीच्या सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी या घटनेचा निषेध करीत जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या निविदेची होळी केली. या वेळी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह गुंजवणी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, शिवसेनेचे वेल्हा तालुकाध्यक्ष शैलेश वालगुडे, काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, रोहन बाठे, दिलीप बाठे, राष्ट्रवादीचे वेल्हा तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, माजी उपसभापती लहू शेलार, सुधीर रेणुसे, मनसेचे दिगंबर चोरगे, विलास बोरगे,भाजपाचे हवेली तालुकाध्यक्ष दीपक रजपूत, विश्वास ननावरे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे भोर तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड, बळीराजा संघटनेचे राजेंद्र कोंडे , सचिव अरविंद सोंडकर, संपतराव अंबवले, संदीप चक्के, मदन खुटवड, गणेश शिळीमकर, राजाराम गिरंजे, विठ्ठल गायकवाड, विष्णू जुगधर, आनंदा रसाळ, अनिरुद्ध यादव आदी सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलसंपदा विभागाने दिलेला शब्द जर पाळत नसेल, तर त्यांना भोर व वेल्हा तालुक्यातील जनता येथील एकही दगडही गुंजवणी संघर्ष समिती हलवू देणार नाही, असा आमचा निर्धार झालेला आहे.
- संग्राम थोपटे आमदार
शेतक-यांमध्ये असंतोष...
1भोर, वेल्हा, हवेलीतील तालुक्यातील वांगणी, वाजेघर व शिवगंगा खोरे या योजनेबाबतची मान्यता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील, असा विश्वास संघर्ष समितीला होता. परंतु, गुंजवणी धरणाच्या बंद पाईपलाईन कामाच्या निविदेसंबंधित जलसंपदा मंत्री यांनी प्रसिद्ध केलेल्या निविदेमुळे शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे.
2पुरंदर सिंचन योजना व्हावी, याकरिता आम्ही सकारात्मकच राहिलो आहोतस, असे असताना जलसंपदा मंत्री यांनी उचललेले पाऊल भोर, वेल्ह्याकरिता धक्कादायक आहे. पुरंदर तालुक्यातील ही योजना आणि इतर योजनांबरोबरच भोर, वेल्हा व हवेलीतील तत्त्वत: मान्यता दिलेल्या योजना यांचे एकत्रित कामाच्या निविदा निघाव्या, असे संघर्ष समितीचे मत आहे. पुरंदर तालुक्यातील बंद पाईप योजनेबरोबरच भोर, वेल्हा व हवेली तालुक्यातील संघर्ष समितीने सुचविलेल्या योजनांचे एकत्रित निविदा निघाव्या, अशी मागणी असतानाही जलसंपदामंत्र्यांनी शेतकºयांची तीव्र नाराजी ओढवून घेतली आहे.