उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे होर्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 09:42 IST2025-03-27T09:41:50+5:302025-03-27T09:42:34+5:30

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात होर्डिंग केली होती.

pune news Case registered against those who posted a caricature of Deputy Chief Minister Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे होर्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे होर्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

- किरण शिंदे 

पुणे -  स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने नुकतेच  सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक गाणे पोस्ट केले. या गाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला आहे. यामुळे आता नवीन वाद सुरू झाला आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कुणाल कामराला पाठींबा दिला जात असून शिंदेंवर टीका केली जात आहे. तर अशात पुण्यात कुणाल कामरा प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शिवसेनेला डिवचलं आहे.




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली होती. यावर आता पोलिसांनी या होर्डिंग लावणाऱ्या अज्ञाता विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कुणाल कामराच्या कवितेचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने बॅनरबाजी केल्याचे या बॅनरवरील मजकुरातून लक्षात येते.

"छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, आपण चिकटवलंय"; संभाजी भिडेंचे विधान

ठाणे, रिक्षा, चष्मा ,दाढी , गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ?" असा प्रश्नही या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्यासह कुणाल कामरा यांचा फोटोही लावण्यात आला आहे. अलका चौकात लावलेल्या होर्डिंगवर रिक्षा, गुवाहाटी, दाडी, चष्मा आणि गद्दार या शब्दाला महाराष्ट्रात बंदी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या होर्डिंगची चर्चा काल दिवसभर शहरात रंगली होती. यानंतर आता पोलिसांनी या होर्डिंग लावणाऱ्या अज्ञाता विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: pune news Case registered against those who posted a caricature of Deputy Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.