वाघ्या श्वानच्या स्मारकावरून वाद : ३१ तारखेलाच अल्टिमेटम का ? लक्ष्मण हाकेंचा संभाजी राजेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:51 IST2025-03-25T12:46:18+5:302025-03-25T12:51:46+5:30

३१ तारखेपर्यंत अतिक्रमण दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे संभाजीराजे छत्रपती यांची मागणी

pune news Controversy over the Tiger Dog monument Why the ultimatum on the 31st? Laxman Haake question to Sambhajiraje Chhatrapati | वाघ्या श्वानच्या स्मारकावरून वाद : ३१ तारखेलाच अल्टिमेटम का ? लक्ष्मण हाकेंचा संभाजी राजेंना सवाल

वाघ्या श्वानच्या स्मारकावरून वाद : ३१ तारखेलाच अल्टिमेटम का ? लक्ष्मण हाकेंचा संभाजी राजेंना सवाल

पुणे - स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असलेल्या एका कथित समाधीविरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ कथित वाघ्या श्वानाची समाधी म्हणून बसवण्यात आलेल्या पुतळ्याविरोधात संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले असून, हा पुतळा त्वरित येथून हटवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

शिवसेनेला मुख्यमंत्रि‍पदाची ऑफर, पण ४ जागांमुळे युती तुटली; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

त्या फेसबुक पोस्टद्वारे लिहिले आहे की, वाघ्या श्वान समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली' यावर  पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके ३१ तारखेलाच अल्टिमेटम का? असा सवाल उपस्थित केला आहे.



दरम्यान, वाघ्या श्वानाच्या स्मारकावरून रायगडावर सुरू असलेल्या वादाला नवे वळण मिळाले आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी संभाजी राजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करत ३१ तारखेच्या अल्टिमेटममागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ३१ तारखेलाच अल्टिमेटम का? असा प्रश्नही हाके यांनी उपस्थित केला आहे.



लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, ३१ मार्च रोजी माता अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती आहे. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या गावी आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रातील वातावरण कलुषित करण्यासाठी मुद्दामच ही तारीख निवडली गेली आहे, असा आरोप हाके यांनी केला.  

ते पुढे म्हणाले, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून संभाजी राजे यांची नियुक्ती झाली आहे. मात्र, किल्ल्याच्या संवर्धनाऐवजी नासधूस सुरू असल्याचा आरोपही हाके यांनी केला. रायगडाच्या इतिहासात होळकर घराण्याचा मोठा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जिर्णोद्धारासाठी होळकरांनी मोठी मदत केली होती. मग आता हा वाद उकरून काढण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  
 
धनगर समाजाने या संपूर्ण घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. रायगडावर काही घडत असेल आणि त्याला धनगर समाजाचा विरोध नसेल, असे होणार नाही. असे ठाम मत लक्ष्मण हाके यांनी मांडले. विशाळगडावर नासधूस झाल्यानंतरही आम्ही विरोध केला होता, तसेच रायगड विकास प्राधिकरणावरून संभाजी राजेंची हकालपट्टी करावी, अशी मागणीही हाके यांनी केली. तर इतिहासतज्ज्ञ संजय सोनवणी यांनीही याच मुद्द्यावरून माहिती दिली ते म्हणाले, इतिहासतज्ज्ञ संजय सोनवणी यांनी या संदर्भात महत्त्वाचे पुरावे समोर आणले असून, रायगड हा पुरातत्त्व खात्याच्या अधिपत्याखाली असल्यामुळे मुख्यमंत्रीदेखील त्यासंदर्भात थेट आदेश देऊ शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  

ते म्हणाले,'पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे रायगड संरक्षित किल्ला आहे. त्याच्यावरचा दगड सुद्धा हरवण्याची कोणाला परवानगी नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. मुळात मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे काय? हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट  म्हणजे याचे इतिहासात पुरावे आहेत. अनेक ऐतिहासिक शिल्पात छत्रपती शिवरायांसोबत हा वाघ्या  दिसत आहे. शिवाजी महाराजांसोबत हा श्वान नेहमी सोबत राहत होता म्हणून याचा इथ उल्लेख दिसतो.

जर्मन लोकांनी देखील दुसरा पुरावा याबाबत जपून ठेवला. १८४५ मध्ये अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. १६८० मध्ये शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांच्या समाधी मांडली आणि तिथं एक कुत्रा महाराजांच्या समाधीकडे पाहत आहे असा उल्लेख पुस्तकात आहे. असे अनेक पुस्तकात उल्लेख आहे. असेही ते म्हणाले.

Web Title: pune news Controversy over the Tiger Dog monument Why the ultimatum on the 31st? Laxman Haake question to Sambhajiraje Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.