"लव्ह मॅरेज केल्यामुळे घराबाहेर काढले, नवीन घरासाठी असं काही केलं की, आता..."
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 10:24 PM2023-01-11T22:24:34+5:302023-01-11T23:27:31+5:30
पत्नीसाठी भलतंच धाडस, आता बसला खडी फोडत
31 वर्षाचा तरुण..एका मुलीच्या प्रेमात पडला.. घरच्यांचा विरोध झुगारून तिच्याशी लग्नही केलं.. त्यानंतर मात्र आई-वडिलांनी त्याला घराबाहेर काढलं.. काही दिवस हा गडी भाड्याच्या घरात राहिलाही.. मात्र भाड्याच्या घरात किती दिवस राहायचं असा विचार त्याला सतत खात होता.. त्यानंतर त्याने नवीन घर घेऊन पत्नीला खुश करण्यासाठी असं काही कृत्य केलं की त्याला आता तुरुंगात जावं लागेल.. नेमकं काय झालं पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून...
पुण्यातील कोंढवा परिसरातील न्याती व्हिटोरिया या उच्चभ्रू सोसायटीमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला जबरी चोरी झाली होती.. या सोसायटीतील एक डिसोझा कुटुंबीय ख्रिसमस साजरा करण्यासाठी चर्चमध्ये गेले होते.. रात्री बारा वाजता जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या घरात जबरी चोरी झाल्याचं उघड झालं होतं.. सोन्या चांदीचे दागिने डायमंडचा नेकलेस मौल्यवान घडाळे आणि रोख रक्कम असा जवळपास 37 लाखाचा मुद्देमाल चोरीला गेला होता.. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता..
दरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते.. जबरी चोरी झाल्याने पोलिसांनी ही तपास मनावर घेतला होता.. प्रत्येक संशयताची कसून चौकशी केली जात होती.. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात होते.. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची छाननी करत असताना जुपिटर दुचाकीने प्रवास करताना एक संशयित व्यक्ती पोलिसांना सापडला.. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीची संपूर्ण कुंडली काढली आणि आंबेगाव परिसरातून त्याला ताब्यात घेतले.. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने चोरी केल्याची कबूल केली...
मलप्पा साहेबांना होसमानी असं या तरुणाचं नाव.. काही दिवसांपूर्वी त्याने प्रेम विवाह केला होता.. मात्र घरच्यांना त्याचा हा विवाह मान्य नसल्याने त्यांनी त्याला घराबाहेर काढले होते.. मात्र पत्नीसाठी नवीन घर घेण्यासाठी त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली..
चोरी केलेल्या या पैशातून नवीन घर घेऊन दुसरीकडे राहण्यासाठी जाण्याचा त्याचा प्लॅन होता.. मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा हा प्लॅन उध्वस्त केला.. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी त्याला अटक केली.. त्याच्या ताब्यातून तब्बल 37 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.