7000 kg Jumbo Puneri Misal : वाह! १२०० किलो फरसाणासह तयार झाली ७००० किलो पुणेरी मिसळ; हजारो गरजू लोकांना होणार वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 03:03 PM2021-03-14T15:03:25+5:302021-03-14T15:07:54+5:30

Maha misal world record 2021: आज पहाटे ३ वाजेपासून महामिसळ तयार करण्यास प्रारंभ झाला. एका मोठ्या कढईत ही मिसळ तयार केली जात आहे.

Pune news maha misal world record 2021 festival master chef vishnu manohar make 7000 kg jumbo misal | 7000 kg Jumbo Puneri Misal : वाह! १२०० किलो फरसाणासह तयार झाली ७००० किलो पुणेरी मिसळ; हजारो गरजू लोकांना होणार वाटप

7000 kg Jumbo Puneri Misal : वाह! १२०० किलो फरसाणासह तयार झाली ७००० किलो पुणेरी मिसळ; हजारो गरजू लोकांना होणार वाटप

googlenewsNext

पुणेकर(Pune) पाट्यांपासून, खाद्यपदार्थांपर्यंत वेगवेगळ्या कारणांसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. पुणेरी मिसळ (pune misal pav)  आपल्या खास चमचमीत चवीसाठी ओळखले जाते. हीच ओळख आता वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (World record) नोंद करण्यासाठी  मास्टर शेफ विष्णू मनोहर (Master Chef Vishnu Manohar) पुढे आले आहे. पुण्यात ७ तासात ७ हजार किलो मिसळ शिजवण्याचा आणि ३ तासात 300 सामाजिक संस्थांमार्फत ३० हजार गोरगरिब, गरजू लोकांपर्यंत ही मिसळ पोहोचवण्याचा विश्वविक्रम केला जात आहे.

आज पहाटे ३ वाजेपासून महामिसळ तयार करण्यास प्रारंभ झाला. एका मोठ्या कढईत ही मिसळ तयार केली जात आहे. या रेसेपीसाठी मोड आलेली मटकी १२००  किलो, कांदा ५०० किलो, आले १२५ किलो, लसूण १२५ किलो, तेल ४०० किलो, कांदा लसूण मसाला १८० किलो, लाल तिखट मिरची पावडर ५०  किलो, हळद ५० किलो, मीठ २५ किलो, खोबरे ११५ किलो, तेज पान १५ किलो, मिक्स फरसाण १२०० किलो, मिनरल वॉटर  ४५०० लिटर, कोथंबीर ५० किलो, अश्या पद्धतीने एकूण ७००० किलोची महा मिसळ शिजवण्यात आली आहे.

लग्नानंतर उलगडलं २५ वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य, वर्षभर करत राहिली गर्भवती होण्याचा प्रयत्न...

संस्थेच्या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधील डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले की, ''विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव घेता यावा तसेच सामाजिक भावनेतून गरीब व गरजू लोकांना अन्नदान करण्यात यावे या उद्देशाने महा मिसळ तयार करण्याचा उपक्रम संस्थेत राबविण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि शेफ विष्णू यांच्या पुढाकारानं महा मिसळीचा रेकॉर्ड करण्यात आला आहे.''

लय भारी! ना बँडबाजा ना पंगत; यवतमाळमध्ये फक्त १३५ रूपयांमध्ये पार पडला विवाहसोहळा 

शेफ विष्णू मनोहर यांनी  याआधी देशभरात अनेक रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. सर्वात मोठं पराठा, ५००० किलोची खिचडी, कबाब अश्या विक्रमानंतर आज शेफ विष्णू मनोहरच्या माध्यमातून तब्बल ७ हजार किलोची महा मिसळ तयार करण्यात आली आहे. यावेळीही त्यांनी माध्यमांशी बोलताना कोणत्या मिसळीची निवड केली, मिसळ वाटपाचे व्यवस्थापन, एकून जिन्नस किती प्रमाणात लागले याबाबत सविस्तर माहिती दिली. 

Web Title: Pune news maha misal world record 2021 festival master chef vishnu manohar make 7000 kg jumbo misal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.