Pune News: जुन्या वादाच्या भांडणातून नायगाव येथे दोघांवर चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 02:20 PM2023-06-24T14:20:42+5:302023-06-24T14:25:01+5:30

या हल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत...

Pune News Two stabbed to death in Naigaon due to old dispute pune news crime | Pune News: जुन्या वादाच्या भांडणातून नायगाव येथे दोघांवर चाकूने वार

Pune News: जुन्या वादाच्या भांडणातून नायगाव येथे दोघांवर चाकूने वार

googlenewsNext

जेजुरी (पुणे) : पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे जुन्या वादाच्या भांडणातून जिवे मारण्याच्या उद्देशाने एकाने दोघांच्या पोटात चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. चाकूच्या हल्ल्यात विशाल अनंता कड (वय ३५) व चुलत भाऊ संतोष कड (दोघेही रा. चौंडकर वस्ती, नायगाव, ता. पुरंदर) हे दोघे जखमी झाले आहेत. तर आरोपी जालिंदर चौंडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी (दि. २०) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास नायगाव येथील चौकात जुन्या भांडणाचा राग मनात धरून जालिंदर चौंडकर याने फिर्यादी विशाल कड व त्याचा चुलत भाऊ संतोष कड या दोघांच्या पोटात दोन वेळा चाकू खुपसून गंभीर दुखापत करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जेजुरी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर तपास करीत आहेत.

Web Title: Pune News Two stabbed to death in Naigaon due to old dispute pune news crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.