Pune News | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत होणार उद्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 08:48 AM2022-07-12T08:48:14+5:302022-07-12T08:49:17+5:30

आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम उद्या...

Pune News Zilla Parishad will leave reservation tomorrow | Pune News | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत होणार उद्या

Pune News | जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत होणार उद्या

googlenewsNext

पुणे :जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडत कार्यक्रम उद्या, बुधवारी होणार आहे.

सोडत कार्यक्रमानंतर १५ जुलै रोजी निवडणूक विभाग, निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. या आरक्षणाबाबत १५ जुलै ते २१ जुलैपर्यंत हरकती तसेच सूचना सादर करता येणार आहेत. २ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या निवडणूक विभाग, निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.

आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्धीनंतर १५ ते २१ जुलै या कालावधीत पुणेजिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या व पंचायत समिती निर्वाचक गणाच्या आरक्षणावरील हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे, बी विंग, तिसरा मजला, तसेच संबंधित तहसील कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा नोडल अधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व गणाचे आरक्षण सोडत कार्यक्रम १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नमूद ठिकाणी होणार आहे.

पुणे जिल्हा परिषद- मा. श्री. शरदचंद्रजी पवार सभागृह, पहिला मजला, जिल्हा परिषद, जुन्नर पंचायत समिती- जुन्नर

आंबेगाव पंचायत समिती- तहसील कार्यालय आंबेगाव,

शिरूर पंचायत समिती -तहसील कार्यालय शिरूर, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सभागृह क्र. १

खेड पंचायत समिती - चंद्रमा गार्डन मंगल कार्यालय, बाडा रोड, राजगुरूनगर, ता. खेड

मावळ पंचायत समिती -भेगडे लॉन, जुना पुणे-मुंबई रस्ता, वडगाव, ता. मावळ

मुळशी पंचायत समिती- सेनापती बापट सभागृह, पंचायत समिती मुळशी (पौड), ता. मुळशी

हवेली पंचायत समिती - जुनी जिल्हा परिषद, महात्मा गांधी सभागृह, पंचायत समिती हवेली

दौंड पंचायत समिती -नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय दौंड,

पुरंदर पंचायत समिती -पंचायत समिती पुरंदर येथील श्री. छत्रपती संभाजी महाराज सभागृह, सासवड, ता. पुरंदर.

वेल्हे पंचायत समिती. वेल्हे

भोर पंचायत समिती- अभिजित भवन मंगल कार्यालय महाड नाका, संजय नगर, ता. भोर

बारामती पंचायत समिती-  कविवर्य मोरोपंत नाटय मंदिर, बारामती

इंदापूर पंचायत समिती इंदापूर.

Web Title: Pune News Zilla Parishad will leave reservation tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.