Pune: पालिकेने बजवलेली नोटिस चुकीची, बेकायदेशीर; उद्योजक पुनीत बालन यांनी दिलं उत्तर, नोटिस रद्द करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 10:41 PM2023-10-25T22:41:28+5:302023-10-25T22:41:49+5:30
Pune News: दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुणे महापालिकने उद्योजक पुनीत बालन यांना नोटीस बजावत तब्बल तीन कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
पुणे - दहीहंडी उत्सवात परवानगी न घेता ठिकठिकाणी जाहिराती लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुणे महापालिकने उद्योजक पुनीत बालन यांना नोटीस बजावत तब्बल तीन कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. या नोटीसीला बालन यांनी उत्तर दिले असून, यात त्यांनी दिलेली नोटीस चुकीची व बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
शहरातील गणेशउत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सव मंडप / स्टेज करिता पूर्वीपासूनच कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच सन 2019 पूर्वी स्थानिक पोलीस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत कमानी व रनिंग मंडप यांना आकारण्यात येत असलेले परवाना शुल्क देखील पालिका मुख्य सभा ठराव क्रमांक 564 अन्वये रद्द करण्यास मान्यता दिलेली आहे. शहरात सन 2019 गणेशोउत्सव कालावधीत मोहरम / दहीहंडी आणि गणेशउत्सव मंडळाना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या नि: शुल्क परवानगी ही पुढील 5 वर्षा करिता म्हणजेच सन 2022 पासून सन 2027 सालापर्यंत गृहीतधरणे बाबत पुणे महापालिका, पुणेकडून सार्वजनिक गणेशउत्सव 2022 करिता सर्व गणेश मंडळे, पोलीस अधिकारी व मनपा अधिकारी यांची दिनांक 08 आगसट 2022 रोजी झालेल्या बैठकीत एकत्रित निर्णय घेण्यात आलेला होता.
या सर्व गोष्टींचा विचार करता पालिकेने नोटीस ही माझे व्यक्तिमत्व बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून पाठवली आहे. त्यामुळे दंडाची ही नोटीस रद्द करण्यात यावी असेदेखील पुनीत बालन यांनी त्यांच्या उत्तरात म्हटले आहे