Anil Deshmukh: पुण्याची देशभरात बदनामी; निष्क्रिय गृहमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत, अनिल देशमुखांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 05:20 PM2024-09-03T17:20:23+5:302024-09-03T17:21:33+5:30

खून, दरोडे, बलात्कार, चोऱ्या, अवैध धंदे व अमली पदार्थ त्याबरॊबरच टोळी युद्धाचा भडका, कोयता गँगच्या दहशतीने पुणेकर भयभीत झाले आहेत

Pune notoriety across the country Inactive Home Ministers should take strict action advises Anil Deshmukh | Anil Deshmukh: पुण्याची देशभरात बदनामी; निष्क्रिय गृहमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत, अनिल देशमुखांचा सल्ला

Anil Deshmukh: पुण्याची देशभरात बदनामी; निष्क्रिय गृहमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत, अनिल देशमुखांचा सल्ला

पुणे: पुण्यात रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आला. नाना पेठेत वनराज आंदेकर चुलत भावासोबत थांबला होते. दुचाकीवरून आलेल्या 13 जणांनी आंदेकरला घेरलं. सुरुवातीला त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आणि त्यानंतर कोयत्याने वार करून. वनराज आंदेकरांचा खून केला. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.

कोयता गॅंग प्रकरण, ड्रग्स प्रकरण, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या यामुळे पुण्यात गुन्हेगारी वाढल्याचे दिसून आले आहे. विरोध पक्षाच्या नेत्यांनी गुन्हेगारीच्या घटनांबाबत राज्य सरकारवर आरोप केले आहेत. सांस्कृतिक राजधानीत अशा घटना घडत असताना सरकार का गप आहे? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीसुद्धा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. निष्क्रिय गृहमंत्र्यांनी या घटना गांभीर्याने घ्याव्यात आणि कठोर पावले उचलावीत. असे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे. 

देशमुख म्हणाले, शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात मागच्या काही दिवसात घडलेल्या घटना कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या आहेत. यातून पुणे शहराची ओळख क्राइम कॅपिटल अशी होत चालली आहे. खून, दरोडे, बलात्कार, चोऱ्या, अवैध धंदे व अमली पदार्थ या दररोजच्या बातम्या बघून सुसंस्कृत पुण्याची देशभरात बदनामी होत असल्याचे जगजाहीर आहे. शहरात टोळी युद्धाचा देखील भडका उडालाय, कोयता गँगच्या दहशतीने पुणेकर भयभीत आहेत. निष्क्रिय गृहमंत्र्यांनी या घटना गांभीर्याने घ्याव्यात आणि कठोर पावले उचलावीत.   

राजकीय व्यक्तींच्या पुण्यात झालेल्या हत्या

१. २००३ - भाजप आमदार माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसाळ यांची हत्या,
२. २०२१ - शिवसेना कसबा युवा सेनेचे विभाग प्रमुख दीपक विजय मारटकर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार, राजकीय वैरातून हत्या झाली होती. दोनजणांना अटक करण्यात आली.
३. २०२३ पुण्यातील मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची शनिवारी १ एप्रिलला प्रतिशिर्डी साईबाबांच्या मंदिरासमोर कोयत्याने वार करून हत्या. प्रवीण गोपाळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते.

Web Title: Pune notoriety across the country Inactive Home Ministers should take strict action advises Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.