पुणे महापालिकेचे सहकार्य , शहरात प्रथमच निर्माल्य खत प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:00 AM2017-08-28T02:00:26+5:302017-08-28T02:00:39+5:30

निर्माल्य व्यवस्थापनासाठी पुण्यातील तीन रोटरी क्लबने पुढाकार घेतला असून, गणेशोत्सवात पालिकेच्या सहकार्याने प्रथमच पुण्यात निर्माल्य खतनिर्मिती प्रकल्प सुरू होत आहे.

Pune Nuclear Cooperation, Nirmalya Khat Project for the first time in the city | पुणे महापालिकेचे सहकार्य , शहरात प्रथमच निर्माल्य खत प्रकल्प

पुणे महापालिकेचे सहकार्य , शहरात प्रथमच निर्माल्य खत प्रकल्प

googlenewsNext

पुणे : निर्माल्य व्यवस्थापनासाठी पुण्यातील तीन रोटरी क्लबने पुढाकार घेतला असून, गणेशोत्सवात पालिकेच्या सहकार्याने प्रथमच पुण्यात निर्माल्य खतनिर्मिती प्रकल्प सुरू होत आहे.
हा प्रकल्प दि. २७ आॅगस्टपासून कार्यरत होणार असल्याची माहिती रोटरी क्लबच्या वतीने पुणे रोटरी वॉटर कमिटी प्रमुख व जलप्रेमी सतीश खाडे यांनी पत्रकाद्वारे दिली.
गणेशपूजा, आरतीसाठी सार्वजनिक मंडळे आणि घरांमध्ये शेकडो टन फुले, दुर्वा वापरल्या जातात. त्याचे विसर्जन गणेशमूर्ती विसर्जनावेळी केले जाते. पालिकेतर्फे या निर्माल्याचे नदीत विसर्जन होऊन नदी प्रदूषित होऊ नये, म्हणून जागोजागी घाटांवर , पुलांवर निर्माल्य कलश उभारले जातात. मात्र, या निर्माल्यातून खतनिर्मिती करुन पालिका हद्दीतील बागांमध्ये वापरण्याचा प्रकल्प रोटरीच्या पुढाकाराने पुण्यात प्रथमच सुरू होत आहे.
या प्रकल्पात निर्माल्याचे श्रेडरद्वारे बारीक तुकडे करुन कंपोस्ट खत केले जाणार आहे. रोटरीने देणगीतून मिळवलेल्या या श्रेडरला पु. ल. देशपांडे उद्यानात पालिका जागा देणार आहे. प्रतिदिन २ टन क्षमता असलेला हा श्रेडर गणेशोत्सव काळात अखंड कार्यरत राहील.

यासाठी रोटरी क्लब आॅफ सिंहगड रोड, रोटरी क्लब आॅफ युवा आणि रोटरी क्लब आॅफ एनआयबीएम या तीन रोटरी क्लबच्या माध्यमातून या प्रकल्पास सुरुवात होणार आहे. यासाठी नुकतीच पालिकेत घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सुरेश जगताप व महापौर मुक्ता टिळक यांची पदाधिकाºयांसमवेत बैठक होऊन या प्रकल्पाला संमती देण्यात आल्याचे सतीश खाडे यांनी सांगितले. रविवारपासून (२७ आॅगस्ट) कार्यान्वित होणाºया या प्रकल्पाचा नदी स्वच्छ राखण्यासाठी उपयोग होणार आहे.

Web Title: Pune Nuclear Cooperation, Nirmalya Khat Project for the first time in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.