पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीला घाबरवण्यासाठी तरुणाचा हवेत गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 10:36 AM2019-02-05T10:36:29+5:302019-02-05T10:37:11+5:30

एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याने तरुणीला घाबरवण्यासाठी तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना बालेवाडी येथे घडली आहे. गोळीबार केल्यानंतर त्यानं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पळून जाण्याच्या प्रयत्न केला.

Pune : One side love case; Boy firing gun into air to scare the girl | पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीला घाबरवण्यासाठी तरुणाचा हवेत गोळीबार

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीला घाबरवण्यासाठी तरुणाचा हवेत गोळीबार

Next
ठळक मुद्देएकतर्फी प्रेम प्रकरण, तरुणीला घाबरवण्यासाठी तरुणाचा हवेत गोळीबारगोळीबार करुन तरुणाची हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी

पुणे : एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याने तरुणीला घाबरवण्यासाठी तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना बालेवाडी येथे घडली आहे. गोळीबार केल्यानंतर त्यानं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पळून जाण्याच्या प्रयत्न केला. यामध्ये हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नीक मार्क कॉलेजच्या लेडिज हॉस्टेलमध्ये मंगळवारी (5 फेब्रुवारी) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सूरज सोनी (मध्य प्रदेश) असे या तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज सोनी हा मूळचा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. सूरज त्याच्याच कॉलेजमधील एका तरुणीवर प्रेम होते. मात्र, ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. यामुळे तिला घाबरवण्यासाठी तो मंगळवारी (5 फेब्रुवारी) लेडिज हॉस्टेलवर गेला़. येथे त्यानं तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोलण्यासही तिनं नकार दिल्याने सूजने तिला घाबरवण्यासाठी आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून होस्टेलमधील मुली बाहेर आल्या.

मुली जमा होत असल्याचे पाहून त्याने स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी हॉस्टेल तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. यात  तो जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सूरज सोनीला ससून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सूरजकडून पिस्तुल कुठून आले?, गोळीबार करण्यामागे त्याचा नेमका काय हेतू होता?, याचा तपास पोलीस करत आहेत. 

Web Title: Pune : One side love case; Boy firing gun into air to scare the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.