Pune: "इतर लोक भरपूर पैसे कमवत आहेत तुम्हीही कमवा सांगत" साडेनऊ लाखांचा गंडा 

By भाग्यश्री गिलडा | Published: November 4, 2023 06:55 PM2023-11-04T18:55:04+5:302023-11-04T18:55:09+5:30

Pune News: स्क्रिनशॉट पाठवण्याचा जॉब असून तो पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कोथरूड परिसरात राहणाऱ्या ५१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. 

Pune: "Other people are earning a lot of money, you should earn too" 9.5 lakhs scam | Pune: "इतर लोक भरपूर पैसे कमवत आहेत तुम्हीही कमवा सांगत" साडेनऊ लाखांचा गंडा 

Pune: "इतर लोक भरपूर पैसे कमवत आहेत तुम्हीही कमवा सांगत" साडेनऊ लाखांचा गंडा 

- भाग्यश्री गिलडा 
पुणे - स्क्रिनशॉट पाठवण्याचा जॉब असून तो पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कोथरूड परिसरात राहणाऱ्या ५१ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २ ऑक्टोबर २०२३ ते ४ ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला. फिर्यादीत म्हटल्यानुसार अनोळखी क्रमांकावरून पार्टटाइम नोकरी करण्यासाठी व्हाॅट्सॲपवर मेसेज आला. पार्टटाइम नोकरीसाठी सहमत असल्याचे सांगितल्यावर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. या ग्रुपमधले सगळे लोक भरपूर पैसे कमवत आहेत. तुम्हाला पण संधी आहे असे सांगून फिर्यादींना विश्वासात घेतले. त्यानंतर स्किनशॉट पाठवण्याचे वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन नंतर पैसे भरण्यासाठी तगादा लावला. आपल्याला ग्रुपमधून बाहेर काढून टाकतील या भीतीने फिर्यादी पॅसीए भारत गेले. त्यांच्याकडून एकूण ९ लाख ६० हजार रुपये उकळले. याप्रकरणी कोथरूड  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करत आहेत.

Web Title: Pune: "Other people are earning a lot of money, you should earn too" 9.5 lakhs scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.