पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर टेंपोचालकाची दुचाकीला जोरदार धडक; पिता - पुत्र जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:22 PM2022-04-18T12:22:19+5:302022-04-18T12:26:40+5:30

युवक व वडील गंभीर जखमी असुन लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Pune Pandharpur palanquin highway tempo driver hit two wheeler Father and son injured | पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर टेंपोचालकाची दुचाकीला जोरदार धडक; पिता - पुत्र जखमी

पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर टेंपोचालकाची दुचाकीला जोरदार धडक; पिता - पुत्र जखमी

Next

नीरा : पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर थोपटेवाडी फाटा येथे भरधाव टेंपोचालकाने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील युवक व वडील गंभीर जखमी असुन लोणंद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

प्रत्यक्षदर्शींकडून मिळलेल्या माहिती नुसार पुण्याकडून भरधाव येणाऱ्या टाटा टँपोने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येऊन लोणंद बाजुकडून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या पिता पुत्राला जखमी केले. दोघे जखमी पाडेगाव (ता.फलटण) येथील राहणारे असून, जखमींना लोणंद (ता.खंडाळा) येथील खाजगी रुग्णालयात उपचारी दाखल करण्यात आले आहे. नीरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सकाळी दहाच्या दरम्यान हा अपघात झाला असुन या अपघाता बाबतची कोणतीही कल्पना दुपारी बारा पर्यंत पोलिसांना दिली नसल्याचे नीरा पोलिसांनी सांगितले.

Web Title: Pune Pandharpur palanquin highway tempo driver hit two wheeler Father and son injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.