पुणे-पटणा विशेष रेल्वेगाडी; महाशिवरात्री व होळीनिमित्त रेल्वे प्रशासनातर्फे सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:42 PM2018-02-03T13:42:19+5:302018-02-03T13:48:21+5:30
महाशिवरात्री व होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या वतीने पुणे ते पटणादरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविली जाणार आहे. दि. २६ फेब्रुवारी ते दि. ५ मार्च या कालावधीत पुणे स्थानकातून ही गाडी सोडण्यात येईल.
पुणे : महाशिवरात्री व होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या वतीने पुणे ते पटणादरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविली जाणार आहे.
दि. २६ फेब्रुवारी ते दि. ५ मार्च या कालावधीत पुणे स्थानकातून ही गाडी सोडण्यात येईल. त्यासाठी विशेष शुल्क आकारले जाणार आहे. या काळात ही गाडी पुणे स्थानकातून प्रत्येक सोमवारी रात्री ८.२० वाजता सुटून बुधवारी सकाळी ८.३० वाजता पटणा येथे पोहोचेल. तर बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजता पटणा स्थानकातून सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता पुण्यात येईल. या गाडीला दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, छिओकी जंक्शन, मुगलसराय, बक्सर आणि आरा याठिकाणी थांबेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून दिली.