पुणेकरांनो आता स्वेटर घालून फिरा...! किमान तापमानात चढ-उतार होणार, थंडी वाढणार

By श्रीकिशन काळे | Published: November 23, 2023 04:39 PM2023-11-23T16:39:08+5:302023-11-23T16:39:25+5:30

पुणे शहरात सध्या काही भागात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे

Pune people wear sweaters now Minimum temperature will fluctuate cold will increase | पुणेकरांनो आता स्वेटर घालून फिरा...! किमान तापमानात चढ-उतार होणार, थंडी वाढणार

पुणेकरांनो आता स्वेटर घालून फिरा...! किमान तापमानात चढ-उतार होणार, थंडी वाढणार

पुणे : पुणे व आजुबाजूच्या परिसरात आकाश ढगाळ राहील. उद्यापासून (दि.२४) अतिहलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.  पुढील चार दिवस किमान तापमानात चढ-उतार होईल. त्यामुळे थंडी अधिक जाणवणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

पूर्वेकडील कमी दाबाची रेषा मालदीव पासून दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे आग्नेय दिशेकडून येणारे वारे राज्यात दक्षिण भागात आर्द्रता वाढतेय. दोन तीन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रात वारे येणार असून, गुजरात, राजस्थानमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत पाऊस वाढेल. २८ ते २९ नोव्हेंबरला पाऊस कमी होईल.

पुणे शहरात सध्या काही भागात किमान तापमान १४ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. त्यामुळे पाषाण, हवेली म्हणजे लोणीकाळभाेर, कदमवाक वस्ती परिसरात गारठा अधिक जाणवत आहे. मगरपट्टा, कोरेगाव पार्क आणि वडगावशेरी या भागात मात्र किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. 

शहरातील किमान तापमान

पाषाण : १४.००
हवेली १४.३
शिवाजीनगर : १५.६
कोरेगाव पार्क : १९.३
मगरपट्टा : २०.३
वडगावशेरी : २१.७

Web Title: Pune people wear sweaters now Minimum temperature will fluctuate cold will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.