Sanjay Raut: पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये पुढचा महापौर शिवसेनेचा असणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 01:17 PM2021-10-13T13:17:38+5:302021-10-13T13:18:15+5:30
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या (mahanagarpalika election) पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे.
पुणे : पुढील वर्षी राज्यात महापालिकेच्या निवडणूक होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. पुण्यातही सत्ताधारी नेत्यांबरोबरच विरोधी पक्षाची राजकीय मंडळी येत आहेत. पुणे महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार. याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. महापौर (mayor) आमचाच अशी वक्तव्य राजकीय नेत्यांकडून केली जात आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये पुढचा महापौर शिवसेनेचा असणार असा पक्का विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील महावीर जैन महाविद्यालयात ते एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते.
''महाविकास आघाडी (mahavikas aghadi) म्हणूनच आम्ही निवडणूक लढणार आहे. राज्यात गेली दोन वर्षे ठाकरे - पवाराचांच बोलबाला हे आगामी काळातही तो दिसेल. पण आतापर्यंत शिवसेनेचा महापौर झालेला नाही याची आम्हाला खंत वाटत असल्याचे ते म्हणाले आहेत.''
''फडणवीस यांच्या मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, कधीकधी लोकांना वाटतं अजूनही यौवनात मी हे नाटक फार गाजलं. रंगमंचावर आम्हालाही वाटतं असं दिल्लीत गेल्यावर त्यांची भावना योग्य आहे. स्वप्नात रममाण व्हावं माणसाने, चांगली स्वप्ने पहावीत, स्वप्नांना बळ असावं, त्यांच्या पंखाना ताकद यावी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यात जावं. असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.''
सावरकरांना भारतरत्न कधी देणार एकदाचं जाहीर करा
भागवत यांना सावरकरांचं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व वाटत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. आम्ही संघाच्या या भूमिकेचं स्वागत करतो. पण सावरकरांना भारतरत्न कधी देणार तेही एकदाचं जाहिर करून टाका. असंही ते म्हणाले आहेत.