... त्यांनी लांबवले चार्जिंगला लावलेले ११ मोबाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 07:51 PM2018-06-14T19:51:03+5:302018-06-14T19:51:03+5:30
पुणे शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजी व फळ बाजारातील गाळ्यांमध्ये कामगार लोकांनी रात्रीच्या वेळी चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली.
पुणे : पुणे शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजी व फळ बाजारातील गाळ्यांमध्ये कामगार लोकांनी रात्रीच्या वेळी चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. सुनील अनंता गायके, ज्ञानेश्वर उर्फ माऊली प्रकाश वाडघरे अशी त्यांची नावे आहेत. यातील आरोपी गायके याच्यावर वारजे पोलीस स्टेशन येथे दोन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
हे आरोपी आंबेडकरनगरजवळच्या मार्केट यार्डमध्ये हे मोबाईल विकायला आले असताना पोलीस हवालदार अनिल घाडगे यांना मिळालेल्या खबरीनुसार त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यावेळी त्यांच्याकडे ११ मोबाईल हँडसेट सापडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना कामगारांचे रात्री चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरल्याचे काबुल केले. या ११ मोबाईलची एकूण किंमत १ लाख १९ हजार इतकी असून त्यातल्या ५ हॅंडसेट चोरीची तक्रार दाखल आहे. उर्वरित मोबाईल मालकांचा शोध पोलिसांच्यामार्फत सुरु असून संबंधितांनी युनिट तीनच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले.