पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे ठाकरे - पवारांचे एजंट; किरीट सोमय्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 06:08 PM2022-02-11T18:08:56+5:302022-02-11T18:09:28+5:30

शनिवारी मी जेव्हा महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो तेव्हा या ठिकाणी पुणे पोलिसांचा एकही कर्मचारी नव्हता

Pune Police Commissioner Amitabh Gupta Uddhav Thackeray sharad Pawar agent Allegations of Kirit Somaiya | पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे ठाकरे - पवारांचे एजंट; किरीट सोमय्यांचा आरोप

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे ठाकरे - पवारांचे एजंट; किरीट सोमय्यांचा आरोप

Next

पुणे : पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे पोलीस आयुक्त नसून ठाकरे-पवारांचे एजंट असल्यासारखे वागतात. पीएमसी बँकेचे सहा हजार 400 कोटी रुपये लाटणाऱ्या राकेश वाधवान यांना ते वॉन्टेड असताना पळवलं होतं. शनिवारी मी जेव्हा महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आलो होतो तेव्हा या ठिकाणी पुणे पोलिसांचा एकही कर्मचारी नव्हता. तेव्हा सर्व पोलीस अमिताभ गुप्ता यांनी गायब केले होते. 

किरीट सोमय्या आज पुणे महानगरपालिकेत आले होते. पुणे शहर भाजपच्या वतीने त्यांचा महापालिकेत सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप केले.

माझ्यावर दगडांनी हल्ला झाल्यानंतर ही अमिताभ गुप्ता यांनी किरकोळ कलम लावले. ज्यांनी माझ्या गाडीवर दगडांनी हल्ला केला त्याच्या बाजूला पोलीस उभे आहेत. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या गुंडावर किरकोळ कलम लावलेत. माझ्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर हत्येचे कलम लावले पाहिजे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या 64 लोकांना अटक केली पाहिजे. याचा सूत्रधार कोण याचा देखील तपास झाला पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

Web Title: Pune Police Commissioner Amitabh Gupta Uddhav Thackeray sharad Pawar agent Allegations of Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.