पुणे पोलिसांकडून साडेचार कोटींचे अमली पदार्थ नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 09:52 PM2021-03-24T21:52:07+5:302021-03-24T21:52:19+5:30
पुणे शहरात अमली पदार्थ विक्री व खरेदी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
पुणे : पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेल्या अमली पदार्थांचा साठा मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनीच्या भट्टीत जाळण्यात आला.
एक कोटी ३१ लाख रुपयांचा ६५५ किलो गांजा, दोन लाख ७८ हजारांचे ४०० ग्रॅम चरस, एक कोटी नऊ लाख ८६ हजारांचे एक किलो ८२१ ग्रॅम कोकेन, सहा लाख ४० हजारांचे मेफेड्रोन, एक कोटी ७४ लाख आठ हजारांचे चार किलो ३५२ ग्रॅम ब्राऊन शुगर, सात लाख ७० हजारांचे एमफेटाफाईन, १४ लाख ४४ हजार रुपये किंमतीचे ३६१ गॅ्रम मॅथेक्युलोन असा सर्व मिळून साडेचार कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
या कारवाईसाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, प्रकाश खांडेकर, गणेश माने, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, उपनिरीक्षक अमोल गवळी, प्रवीण शिर्के, प्रमोद ढिरंगे, गणेश देशपांडे यांनी केली.