पुणे पोलिसांचा मोर्चा आता ड्रग्स पेडलर्सकडे; राज्यातील मेट्रो शहरात राबवणार सर्च ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 11:07 AM2024-03-01T11:07:49+5:302024-03-01T11:08:49+5:30

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे छापे टाकून ३ हजार ६०० कोटींचे मेफेड्रोन जप्त करत आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले....

Pune police march now towards drug peddlers; Search operation will be conducted in metro cities of the state | पुणे पोलिसांचा मोर्चा आता ड्रग्स पेडलर्सकडे; राज्यातील मेट्रो शहरात राबवणार सर्च ऑपरेशन

पुणे पोलिसांचा मोर्चा आता ड्रग्स पेडलर्सकडे; राज्यातील मेट्रो शहरात राबवणार सर्च ऑपरेशन

पुणे :पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग निर्मितीचा कारखाना आणि घाऊक विक्रीची साखळी उद्ध्वस्त केली. त्यानंतर आपला मोर्चा आता ड्रग विक्रीच्या किरकोळ (रिटेल) साखळीतील ५० पेडलर्सच्या शोधाकडे वळवला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यासाठी गुन्हे शाखेची पथके तयार केली असून, किरकोळ विक्रीचे हे जाळेही लवकरच उद्ध्वस्त केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे छापे टाकून ३ हजार ६०० कोटींचे मेफेड्रोन जप्त करत आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले. यातील मुख्य सूत्रधार संदीप धुनिया परदेशात फरार झाला आहे. त्यासाठी लूक आउट आणि रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. त्याचा शोध केंद्रीय तपास यंत्रणा करत आहेत. ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक केली असून, इतर ६ आरोपींचा शोध पुणे पोलिस घेत आहेत. या माध्यमातून पुणे पोलिसांनी निर्मिती, वाहतूक आणि घाऊक विक्रेत्यांची साखळी उघडकीस आणून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.

पुणे पोलिसांनी आता किरकोळ विक्रेते तसेच पेडलर्सची साखळी शोधणे सुरू केले आहे. या साखळीतील ५० जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यातील काही अमली पदार्थ विक्रीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या सर्वांच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथके निर्माण केली आहेत. अशा प्रकारे पोलिस ग्राहकांपर्यंत ड्रग पोहोचवणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचणार आहेत. यासाठी राज्यातील मेट्रो सिटीमध्ये मोठे ऑपरेशन राबवण्यात येणार आहे. यातून पेडलर्सची साखळी उद्ध्वस्त करण्यात येणार आहे.

ड्रग्ज पेडलर्सबरोबर शहरात गांजाची विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे. यातील ५०० ते ६०० जणांची नावे समोर आली असून, त्यांच्यावर सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.

- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

Web Title: Pune police march now towards drug peddlers; Search operation will be conducted in metro cities of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.