कोरोना चे नियम न पाळणे पुण्यातील ४ हॉटेल्स ना पडलं महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 10:48 IST2021-03-15T10:40:00+5:302021-03-15T10:48:47+5:30

कोरेगांव पार्क मधील ४ हॉटेल्स वर पुणे पोलिसांची कारवाई

Pune police take action against 4 restaurants in koregaon park for violating covid norms | कोरोना चे नियम न पाळणे पुण्यातील ४ हॉटेल्स ना पडलं महागात

कोरोना चे नियम न पाळणे पुण्यातील ४ हॉटेल्स ना पडलं महागात

 

लॉक डाऊन चे नियम न पाळणाऱ्या पुण्यातील 4 हॉटेल्सवरपुणे पोलिसांची कारवाई केली आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील हे हॉटेल आहेत.क्षमते पेक्षा जास्त लोकांना हॉटेल मध्ये प्रवेश देणे ,डिस्टसींग चे नियम न पाळणे यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

मात्र हॉटेल मर्फीज, हॉटेल टल्ली, हॉटेल द डेली, हॉटेल पब्लिक अशी या चार हॉटेल्स ची नाव आहेत.  कोरोनासंदर्भातील नियम पाळले गेले नाही म्हणून पोलीसांनी धाड टाकत ही कारवाई केली आहे. 

सध्या पुण्यात हॉटेल्स ना १० पर्यंत परवानगी देण्यात आले आहे. तसेच १० ते११ मध्ये फक्त होम डिलिव्हरी ला परवानगी आहे. त्याबरोबरच या हॉटेल ने ग्राहकांची नोंद ठेवून किती क्षमतेने ते सुरू आहे याची माहिती देखील पुरवणे आवश्यक आहे. तसेच ५० टक्के क्षमतेने हे हॉटेल चालू शकतात.या सर्व नियमांचा उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

Web Title: Pune police take action against 4 restaurants in koregaon park for violating covid norms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.