"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 01:57 PM2024-05-29T13:57:18+5:302024-05-29T14:01:28+5:30
Pune Porsche Accident : पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे समोर आले आहे.
पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. डॉक्टरांनी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता तपास सुरू आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉक्टरांबाबत भीती व्यक्त केली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. हळनोर यांना पोलिस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
"डॉ. अजय तावरे यांची अटक झाली आहे, अटक झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे भरपूर नावे आहेत, मी कुणालाही सोडणार नाही, असं वाक्य उच्चारलं आहे. अशावेळी एक की विटनेस म्हणून डॉ. अजय तावरे यांची सुरक्षितता महत्वाची ठरते. पुरावे नष्ठ करण्याच्या दृष्टीने अजय तावरे यांच्या जीवाला धोका का होणार नाही, अशी भीती ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अजय तावरे यांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यांना सुरक्षा द्या, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरही पोस्ट करुन मागणी केली आहे. "४ जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन. पण तोवर डॉ. अजय तावरे च्या जीविताची सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते, असंही अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
'बाळा'च्या वडिलांनी डॉक्टरांना १५ कॉल केले
आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यापूर्वी डॉ. अजय तवारे आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात व्हाट्सअॅप आणि फेसटाइमवर चौदा कॉल आणि एक नॉर्मल कॉल झाला होता. हे फोन कॉल सकाळी ८:३० ते १०:४० च्या सुमारास झाले होते आणि सकाळी ११ वाजता ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.
तत्पूर्वी, पोलिसांनी १९ मेरोजी झालेल्या अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचा खुलासा केला होता. यानंतर, सरकारी रुग्णालयाती फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. अजय तवारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर आणि एक कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. या लोकांनी पैशांच्या लालसेपोटी आरोपीचे ब्लड सॅम्पल बलल्याचा आरोप आहे. यामुळे कार चालक आरोपीने दारू प्यायल्याची पुष्टी झाली नव्हती.
4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन.
पण तोवर डॉ अजय तावरे च्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटते. @PTI_News@ANI— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 29, 2024