"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 04:14 PM2024-05-30T16:14:43+5:302024-05-30T16:57:53+5:30

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणातील आरोपी डॉ. श्रीहरी हळनोर याने पोलिसांकडे धक्कादायक माहिती दिली आहे.

Pune Porsche Accident Dr Srihari Halnor explained reason for blood sample Change | "हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली

"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली

Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरणात पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागात अल्पवयीन मुलाने मद्यपान करुन भरधाव वेगाने कार चालवत दोघांची हत्या केली होती. त्यानंतर आरोपीचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याआधी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी त्यामध्ये फेरफार केली होती. डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हळनोर याने अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने कचऱ्यात टाकले आणि त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने लॅबमध्ये पाठवून दिले. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पुणेपोलिसांनी दोन्ही डॉक्टरांना अटक केली आहे. मात्र आता रक्ताचे नमुने बदणाऱ्या डॉ श्रीहरी हळनोर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्याच्या ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनाही पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. पोलिसांनी श्रीहरी हळरनोर यांच्याकडून यासाठी घेतलेले लाखो रुपये जप्त केले. डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांनी पैसे घेऊन अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये न पाठवाता कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. त्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवून दिले. आरोपीचे आणि त्याच्या वडिलांच्या रक्ताचे नमुने मॅच  झाल्याने पोलिसांनी अधिक तपास करुन दोन्ही डॉक्टरांना अटक केली. त्यानंतर मी शांत बसणार नाही. मी सर्वांची नावे घेईन, असा इशारा डॉ. अजय तावरेने दिला होता. दुसरीकडे आता डॉ. श्रीहरी हळनोरने दबावाखाली हे काम केल्याची माहिती पोलिसांना दिली.


डॉ. श्रीहरी हळनोर हे आपत्कालीन विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. अटक करण्यात आलेले डॉ.श्रीहरी हरनोर यांची प्रकृती अचानक बिघडली होती. हळनोरने इन्फेक्शन झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. आता पोलीस तपासात श्रीहरी हळनोरने धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या हळनोरने पोलीस जबाबात या प्रकरणातील मास्टरमाईंड हा अजय तावरेंच असल्याचे म्हटलं आहे. "रक्ताच्या नमुन्यांमध्ये बदल केल्याचा प्रकार आपल्या मनाला पटला नाही. माझ्या हातून हा उद्योग करुन घेण्यात आल्यामुळे मला दोन दिवस झोप लागली नाही," अशी माहिती हळनोरने पोलिसांना दिली.

दरम्यान, रक्ताचे नमुने बदलण्याच्या प्रकरणात आता अल्पवयीन आरोपीच्या आईची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. आरोपीचे रक्ताचे नमुने घेताना त्याची आई तिथेच उपस्थित होती असा दावा काही माध्यमांनी केला होता. त्यानंतर  या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाची आई सुद्धा सहभागी आहे का? याचा तपास पोलीस अधिकारी करणार आहेत.

Web Title: Pune Porsche Accident Dr Srihari Halnor explained reason for blood sample Change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.