Pune Porsche Accident News इतर लॅबमध्ये डीएनए टेस्टिंग केल्यावर रक्ताचे सॅम्पल बदलल्याचे समोर; पोलीस आयुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:12 AM2024-05-27T11:12:06+5:302024-05-27T12:40:12+5:30
Pune Porsche Accident News ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार
Pune Porsche Accident News :- पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, "आम्ही तावरे आणि हलनोर यांना रक्ताचे नमुने बदलून रक्ताच्या नमुन्याच्या अहवालात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली आहे. आम्ही हॉस्पिटलमधील संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केला आणि हेराफेरी लक्षात आली. त्यानंतर आमच्या टीमने दोन डॉक्टरांना अटक करण्याचा निर्णय घेतला. दोघेही हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागात नेमणुकीस आहेत.
अपघातानंतर मेडिकल टेस्टसाठी त्या अल्पवयीन मुलाला आणलं असता सँपल बदलण्यात आलं. पुणे पोलिसांनी इतर लँबमध्ये या मुलाचं डीएनए टेस्टिंग केल्यावर हि माहिती समोर आली आहे. एवढच नाही तर धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितशे कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने वाहन चालवून केलेल्या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला. या अल्पवयीन बाळाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली हाेती. मित्रांबरोबर तो रविवारी रात्री पार्टी करण्यासाठी गेला होता. पार्टीला जाताना त्याने वडिलांकडून पोर्शे ही महागडी कार घेतली होती. मुलगा मद्यप्राशन करतो, याची माहिती बांधकाम व्यावसायिक वडिलांना होती. अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांनी हाॅटेल कोझी आणि हाॅटेल ब्लॅकमध्ये मद्य प्राशन केले. तेथे त्यांनी जेवण केले. दोन तासांत मुलाने मद्यपार्टीवर ४८ हजार रुपये खर्च केले. पोलिसांनी दोन्ही हाॅटेलमधील चित्रीकरण तपासले. तेव्हा मुलगा आणि त्याचे मित्र मद्यप्राशन करीत असल्याचे दिसून आले आहे. हाॅटेलमधील बिल मुलाने ऑनलाइन दिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ऑनलाइन बिल अदा केल्याच्या नोंदी तपासासाठी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांनी मुलाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून तसेच खासगी रुग्णालयात पाठविले होते.