पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 09:48 AM2024-05-29T09:48:35+5:302024-05-29T09:52:00+5:30

आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यापूर्वी डॉ. अजय तवारे आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात व्हाट्सअॅप आणि फेसटाइमवर चौदा कॉल आणि एक नॉर्मल कॉल झाला होता. हे फोन कॉल सकाळी 8:30 ते 10:40 च्या सुमारास झाले होते आणि सकाळी 11 वाजता ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.

pune Porsche car accident 15 calls in 2 hours The baby's father pressured the doctor to change the sample  | पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 

पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 

पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातप्रकरणी सध्या अल्पवयीन  आरोपीच्या ब्लड सॅम्पलसंदर्भात तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तीन सदस्यीय समितीने मंगळवारी ससून सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यानंतर आता, यासंदर्भात नवीन अपडेट समोर आले आहे.

आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यापूर्वी डॉ. अजय तवारे आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात व्हाट्सअॅप आणि फेसटाइमवर चौदा कॉल आणि एक नॉर्मल कॉल झाला होता. हे फोन कॉल सकाळी 8:30 ते 10:40 च्या सुमारास झाले होते आणि सकाळी 11 वाजता ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.

तत्पूर्वी, पोलिसांनी 19 मेरोजी झालेल्या अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचा खुलासा केला होता. यानंतर, सरकारी रुग्णालयाती फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. अजय तवारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हलनोर आणि एक कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. या लोकांनी पैशांच्या लालसेपोटी आरोपीचे ब्लड सॅम्पल बलल्याचा आरोप आहे. यामुळे कार चालक आरोपीने दारू प्यायल्याची पुष्टी झाली नव्हती.

पोलिसांनी कुटुंबाची कुंडलीच बाहेर काढली -  
विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागलाय. या प्रकरणात पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालसह कुटुंबाची कुंडलीच बाहेर काढली आहे. विशाल अग्रवाल याच्या घरावर छापेमारी केल्यानंतर, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासण्यात येत आहेत. या फुटेजमुळे अग्रवाल कुटुंबियांची कुंडलीच पोलिसांना मिळाली आहे. 

आजोबांना आणि वडिलांना पोलीस कोठडी -
बाळाचे आजोबा सुरेंद्रकुमार यांना, चालकाला डांबून ठेवणे, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी आदी आरोपांखाली आटक करण्यात आली आहे. त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बाळाला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. तर विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरेंद्रकुमार अग्रवाल याचे छोटा राजनशी असलेले कनेक्शन या निमित्ताने पुन्हा समोर आल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यातच दोघा बाप-बेट्यांनी त्यांच्या चालकाला डांबून ठेवून धमकी दिल्याने अग्रवाल यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. बाळाच्या चुकीमुळे तीन पिढ्यांना जेलची हवा खावी लागत असल्याचे बोलले जात आहे. कालच्या प्रकरणानंतर त्यांनी अजून कोणाला मदत मागितली आहे का? हे तपासण्यासाठी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. 

Web Title: pune Porsche car accident 15 calls in 2 hours The baby's father pressured the doctor to change the sample 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.