Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 07:34 PM2024-05-29T19:34:03+5:302024-05-29T19:34:40+5:30

पुण्यातील ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरण राज्यभरात चांगलेच गाजत आहे...

Pune Porsche case: Founder of Sassoon Hospital Dr. Vinayak Kale sent on immediate compulsory leave | Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर

Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. अपघातानंतर अल्पवयीन चालकाचे रक्ताचे नमुने ससुन रुग्णालयात पाठविण्यात आले होते. पण ते नमुने नष्ट करून दुसरा रिपोर्ट देण्यात आला. यामध्ये त्या चालकाने दारू न पिल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या तपासानंतर ज्यांनी रुग्णालयातील रिपोर्टमध्ये बदल केला त्या डॉक्टरांना अटक केली होती. डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोरचा समावेश होता. या दोघांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्यावतीने निलंबन आज निलंबन करण्यात आले. तसेच बीजे मेडिकल कॉलेजचे (ससुन रुग्णालयाचे) अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.  

काळे यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. पुण्यातील ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरण राज्यभरात चांगलेच गाजत आहे. ज्या डॉक्टरांनी हे कृत्य केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून ते अटकेत आहेत. रुग्णालयातील या प्रकाराची चौकशी करण्यासाठी एक एसआयटी समितीही नेमली आहे. पण या समितीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे टीका होत आहे. 

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बाळाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटक झालेल्या दाेन्ही डाॅक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. यात ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ. अजय तावरे आणि अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीहरी हाळनाेर यांचा समावेश हाेता. त्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी हे आदेश काढले. न्यायवैद्यकशास्त्र विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यालाही निलंबित केले आहे. आता काळे यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी

पोर्श अपघात प्रकरणात रोज नवे खुलासे होताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात पुण्याच्या कल्याणीनगर भागात विशाल अगरवाल याच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत दोघांची हत्या केली. या हत्येनंतर काही तासांतच आरोपीला जामीन मिळाला होता. या जामिनासोबत अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळातील सदस्यांनी काही अटीशर्थींचे पालन करण्यास सांगितले होते. आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहीण्याच्या अटीवर जामीन मिळाला होता. ही बाब समोर येताच सगळीकडे संतापाची लाट उसळली होती. या सगळ्या प्रकारानंतर आता या अटीशर्थी घालणाऱ्या बाल न्याय मंडळातील सदस्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पाेर्शे कार अपघात AI द्वारे उलगडणार; जर्मनीचे तंत्रज्ञ पुण्यात, घटना 'जिवंत' करणार

महाराष्ट्र सरकारने बाल न्याय मंडळाच्या सदस्यांच्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी आणि पुणे अपघात प्रकरणात आदेश जारी करताना निकषांचे पालन केले आहे की नाही हे तपासण्यासाठी एक समिती स्थापन केल्याची माहिती पुढे आली आहे.  बाल न्याय मंडळाच्या सदस्यांच्या वर्तनाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नरनावरे यांनी दिली. त्यामुळे पुणे अपघात प्रकरणात बाल न्याय मंडळाच्या सदस्यांकडून नियमांचे पालन केले गेले होते का याची चौकशी ही समिती करणार आहे. या समितीने त्यांचा अहवाल पुढील आठवड्यात सादर करणे अपेक्षित आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Pune Porsche case: Founder of Sassoon Hospital Dr. Vinayak Kale sent on immediate compulsory leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.