Pune Porsche accident: कोरेगाव पार्क, मुंढव्यातील पबवर पालिकेचा हातोडा, अपघातानंतर प्रशासन जागे
By राजू हिंगे | Published: May 22, 2024 02:30 PM2024-05-22T14:30:13+5:302024-05-22T14:30:39+5:30
कोरेगाव पार्क येथील वॉटर्स आणि ओरिला या दोन पबवर महापालिकेने कारवाई केली...
पुणे : अनधिकृत पब, बार आणि रूप टॉप हॉटेलवरील कारवाई मागील अनेक दिवसांपासून थंडावली होती. कल्याणीनगर येथे अपघात हाेऊन दाेघांचा बळी गेल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. खराडी भागातील दोन रूफ टॉप हॉटेलवर कारवाई केल्यानंतर आज पालिकेच्या बांधकाम विभागाने अनविंड आणि न्यु हॉटेल हिंगणे या पबवर कारवाई केली. यामध्ये २४ हजार स्केअर फुट बांधकाम आणि पत्राचे शेड हटविण्यात आले. कोरेगाव पार्क येथील वॉटर्स आणि ओरिला या दोन पबवर महापालिकेने कारवाई केली.
कल्याणीनगर येथील बॉलर पबसमोर बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने कार भरधाव चालवून धडक दिली. यात तरुणीसह दोघांना जीव गमवावा लागला आहे. यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने खराडी भागात सर्व्हे क्रमांक ५९ मधील हॉटेल टीकटीक आणि हॉटेल क्वार्टर या दोन रूफ टॉप हॉटेलवर कारवाई केली होती. खराडी भागातील दोन रूफ टॉप हॉटेलवर कारवाई करून शेड काढून टाकले. खराडी भागातील दोन रूफटॉप हॉटेलवर कारवाई केल्यानंतर आज पालिकेच्या बांधकाम विभागाने अनविंड आणि न्यु हॉटेल हिंगणे या पबवर कारवाई केली. यामध्ये २४ हजार स्केअर फुट बांधकाम आणि पत्राचे शेड हटविण्यात आले. कोरेगाव पार्क येथील वॉटर्स आणि ओरिला या दोन पबवर महापालिकेने कारवाई केली.
शहराच्या विविध भागांत इमारतींच्या टेरेसवर, सामाईक जागेत शेड उभी करून हॉटेल व्यवसाय केला जात आहे. यामुळे या भागातील रस्त्यांवर पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो, तसेच रात्री उशिरापर्यंत ही हॉटेल सुरू राहतात. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.
कारवाई झालेले पब/हॉटेल
१) चिलीज, मुंढवा
२) कार्निवल रेस्टॉरंट
३) कुक्कु
४) हायलँड
५) मुस्कान व्हेजेटेबल फुड सेंटर
६) न्यु मोबल फ्लावर
७) दि बाउंटी सिझलर्स
८) हप्पा
९) पेरगोला
१०) रॉक मोमोस
११) २७ डेली
१२ ) फ्लोअर वर्क
Pune Porshe accident: कोरेगाव पार्क, मुंढव्यातील पबवर पालिकेचा हातोडा, अपघातानंतर प्रशासन जागे#pune#encroachmentpic.twitter.com/IluvA0OyKM
— Lokmat (@lokmat) May 22, 2024