अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाला डांबून ठेवले; अग्रवाल बाप लेकाला जामीन

By नम्रता फडणीस | Published: July 2, 2024 08:11 PM2024-07-02T20:11:35+5:302024-07-02T20:12:07+5:30

आठवड्यातून २ वेळा पोलिस ठाण्यात हजेरी, जिल्ह्याची हद्द सोडून जाऊ नये, पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा आणि साक्षीदारांवर दबाव आणू नये, आदी अटी-शर्तींवर जामीन

pune porshe car accident Car driver stopped Agarwal granted bail to father and daughter | अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाला डांबून ठेवले; अग्रवाल बाप लेकाला जामीन

अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाला डांबून ठेवले; अग्रवाल बाप लेकाला जामीन

पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणात कार चालकाला धमकावून बंगल्यात डांबून ठेवल्याप्रकरणी आरोपी सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर प्रथमवर्ग
न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी अटी शर्तींवर् जामीन मंजूर केला.

आठवड्यातून दोन वेळा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, जिल्ह्याची हद्द सोडून बाहेर जाऊ नये, तसेच पासपोर्ट पोलिसांकडे जमा करावा आणि साक्षीदारांवर दबाव आणू नये, आदी अटी-शर्तींवर न्यायालयाने अग्रवाल बापलेकाला जामीन मंजूर केला. त्यामुळे सुरेंद्रकुमार अग्रवाल कारागृहाबाहेर येणार असला तरी रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विशाल अग्रवाल मुक्काम येरवडा कारागृहातच असणार आहे.

'पोर्शे’ कार भरधाव चालवून तरुण-तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा गुन्हा स्वत:च्या अंगावर घेण्यासाठी चालकाला बंगल्यात डांबून ठेवत त्याचा मोबाइल फोन काढला. तसेच त्याला धमकावल्याप्रकरणी सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अग्रवाल (वय ७७) आणि विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) यांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील योगेश कदम आणि बचाव पक्षातर्फे अँड प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली.

Web Title: pune porshe car accident Car driver stopped Agarwal granted bail to father and daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.