पुण्यातील 'प्रेमाचा चहा' मध्ये मिठाचा खडा; परस्पर अनेक राज्यात रिटेलरशिप देऊन १ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 04:29 PM2022-07-24T16:29:33+5:302022-07-24T16:40:30+5:30

लोणी काळभोर पोलिसांनी तत्त्कालीन संचालक अमित गोरक्षनाथ मगर (रा. डेफ्रोडील्स, मगरपट्टा सिटी, हडपसर) आणि स्वप्निल बाळासाहेब तुपे (रा. माळवाडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला

Pune premacha chaha 1 Crore fraud by giving relatorship in several states | पुण्यातील 'प्रेमाचा चहा' मध्ये मिठाचा खडा; परस्पर अनेक राज्यात रिटेलरशिप देऊन १ कोटींची फसवणूक

पुण्यातील 'प्रेमाचा चहा' मध्ये मिठाचा खडा; परस्पर अनेक राज्यात रिटेलरशिप देऊन १ कोटींची फसवणूक

Next

पुणे : "प्रेमाचा चहा" या कंपनीच्या संचालक मंडळावर असताना परस्पर कंपनीच्या फ्रँचायझीचे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात वाटप केले. त्यांच्याकडून मिळालेली रक्कम स्वत:च्या बँक खात्यात स्वीकारुन खोटी कागदपत्रे तयार करुन कंपनीची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलिसांनी तत्त्कालीन संचालक अमित गोरक्षनाथ मगर (रा. डेफ्रोडील्स, मगरपट्टा सिटी, हडपसर) आणि स्वप्निल बाळासाहेब तुपे (रा. माळवाडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ पंढरीनाथ भाडळे (वय ३८, रा. उरुळी देवाची, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ फेब्रुवारी २०२१ ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमाचा चहा याची पुणे शहरात व इतरत्र आऊटलेट आहेत. प्रेमाचा चहा प्रा़ लि़ कंपनीवर आरोपी अमित मगर आणि स्वप्निल तुपे हे संचालक म्हणून काम करीत असताना कंपनीचा जीएसटी भरणा त्यांनी केला नाही. तसेच कंपनीचा आयकरही भरला नाही. कंपनीच्या खात्यात जमा होणारी रक्कम परस्पर स्वत:च्या खात्यात वळती करुन अनाधिकृतपणे आऊटलेटचे वाटप केले. सोशल मीडियाचा ताबा स्वत:कडे ठेवली कंपनीचा रजिस्टर मोबाईल हा त्याचे प्रेमाचा चहा फुड प्रोडक्ट नावाने एलएलपी कंपनीच्या कामकाजाकरीता वापर करुन कंपनीचे नुकसान केले.

कंपनीच्या फेसबुक पेजवरुन ७ जून २०२१ रोजी फिर्यादी व विक्रांत भाडळे यांना कोणतीही पूर्व सूचना न देता अनाधिकृतीपणे रिमूव्ह केले. कंपनीने रिटेलरबरोबर केलेले लिखीत अग्रीमेंट गहाळ झाल्याचे खोटे सांगितले. या दोघा आरोपींना प्रेमाचा चहा प्रा. लि. कंपनीचे संचालकपदावरुन काढले. त्यांच्याकडे कंपनीचा कसल्याही प्रकाराचे अधिकारी नसताना त्यांनी संगनमत करुन आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील रिटेलर यांना अनाधिकृतपणे प्रेमाचा चहा नावाने फ्रँचायझीजचे वाटप करुन त्यांच्याकडून प्राप्त झालेली रक्कम बँक खात्यात स्वीकारुन कंपनीचा अनाधिकृतपणे लोगोचा वापर करुन कंपनीचा रजिस्टर मोबाईलची चोरी करुन कंपनीची दिशाभूल केली. खोटी कागदपत्रे तयार करुन कंपनीची १ कोटी ६७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करीत आहेत.

Web Title: Pune premacha chaha 1 Crore fraud by giving relatorship in several states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.