पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 06:19 PM2022-06-29T18:19:30+5:302022-06-29T18:20:01+5:30
सकाळापासूनच स्टेशनवर आरपीएफ, डॉग स्कॉड, बॉम्ब शोध पथक, पोलीस तैनात करण्यात आले आहेत
पुणे : पुणेरेल्वे स्टेशनला उडवून देण्याचा धमकीचा फोन पुणे पोलिसांना आला आहे. सकाळापासूनच स्टेशनवर आरपीएफ, डॉग स्कॉड, बॉम्ब शोध पथक, पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्टेशन परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस आसपास होणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे. पुणे पोलिसांना हा धमकीचा फोन कुठून आला याचा तपास सुरु आहे.
मे महिन्यातही पुणे स्टेशन उडवून देण्याची धमकी आली होती. त्याबरोबरच आरोपींनी फोनवरून पैशाची मागणीही केली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने तपासाला लागली होती. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आले होते. पुन्हा असाच प्रकार घडल्याने आरोपींचा शोध घेण्यास पोलीस तातडीने कामाला लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.