पुणे रेल्वे स्थानक सतर्क; रेल्वेने पाठवल्या जाणाऱ्या पार्सलचे आता होणार स्कॅनिंग

By नितीश गोवंडे | Published: May 14, 2023 03:16 PM2023-05-14T15:16:42+5:302023-05-14T15:16:59+5:30

पुणे स्थानकावर यापूर्वी अनेकदा पार्सलद्वारे आलेला गुटखा पकडण्यात आला आहे.

Pune railway station on alert Scanning of parcels sent by rail will now take place | पुणे रेल्वे स्थानक सतर्क; रेल्वेने पाठवल्या जाणाऱ्या पार्सलचे आता होणार स्कॅनिंग

पुणे रेल्वे स्थानक सतर्क; रेल्वेने पाठवल्या जाणाऱ्या पार्सलचे आता होणार स्कॅनिंग

googlenewsNext

पुणे : प्रवाशांच्या सुरक्षितत्तेला प्राधान्य देत रेल्वेने त्यांच्यामार्फत पाठवल्या जाणाऱ्या पार्सलचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्या पार्सलमधून नेमके काय जात आहे, याबाबत पारदर्शकता राहणार आहे. यासाठी पुणेरेल्वे प्रशासनाने दोन स्कॅनिंग मशिन देखील मागवल्या असून, लवकरच त्या पुणे स्थानकावरील पार्सल कार्यालयात दाखल होणार आहेत.

गेल्या वर्षी रेल्वेच्या पार्सल डब्यात स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी पार्सलने तलवारी पाठवण्याचा प्रकारदेखील उघडकीस आला आहे. पुणे स्थानकावर यापूर्वी अनेकदा पार्सलद्वारे आलेला गुटखा पकडण्यात आला आहे. यामुळे रेल्वे गाडी व प्रवाशांची सुरक्षितता अनेकदा धोक्यात आल्याची स्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. याद्वारे संशयित वस्तू वा पार्सल यावर नजर ठेवणे सोपे होणार आहे. येत्या काही दिवसांत पार्सल कार्यालयात दोन मशिन दाखल होतील.

पुणे पार्सल ऑफिस रोजची स्थिती

स्थानकावर येणारे : २९०० पॅकेजेस
वजन : १००० क्विंटल
पुण्याहून जाणारे : ३६०० पॅकेजेस
वजन : ८०० क्विंटल
उत्पन्न : सात लाख रुपये
वर्षाला : सुमारे २४ कोटी रुपये

Web Title: Pune railway station on alert Scanning of parcels sent by rail will now take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.