पुणे रेल्वेस्थानकाच्या ‘पुनर्निर्माणा’चे काम लवकरच; ‘इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग’ इमारतीचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:10 IST2025-01-06T10:10:33+5:302025-01-06T10:10:59+5:30

पुनर्निर्माणाच्या कामासाठी १६८ कोटी रुपये लागणार असून पूर्वीपेक्षा आता बजेट कमी झाला आहे

Pune Railway Station reconstruction work to begin soon Work on electric interlocking building begins | पुणे रेल्वेस्थानकाच्या ‘पुनर्निर्माणा’चे काम लवकरच; ‘इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग’ इमारतीचे काम सुरू

पुणे रेल्वेस्थानकाच्या ‘पुनर्निर्माणा’चे काम लवकरच; ‘इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग’ इमारतीचे काम सुरू

पुणे : पुणे रेल्वेस्थानकाच्या ‘पुनर्निर्माण’चे काम येत्या काही दिवसांत सुरु करण्यात येणार आहे. या कामासाठी ‘इंटेग्रेटेड प्लॅन’ बनविला आहे. पुनर्निर्माणाच्या कामासाठी १६८ कोटी रुपये लागणार आहे. पूर्वीपेक्षा आता बजेट कमी झाला आहे. ‘इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग’ इमारतीचे काम सुरू केले असून, ते या वर्षांतच पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी दिली.

पुणे रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. यासाठी दोनवेळा आराखडा देखील तयार करण्यात आला होता. किती दिवस ब्लॉक घेऊन काम हे देखील ठरले हाते. पण, ते काम काही सुरू झाले नाही. त्यामुळे रेल्वेने आता एकाच वेळी पुनर्निर्माण आणि रेल्वेस्थानकाचा विस्तार, विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम आता एकाच टप्प्यात केले जाणार आहे. त्यामध्ये नव्याने दोन फलाट वाढविण्यात येणार आहेत.

पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदु दुबे यांनी म्हणाल्या की, पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनर्निर्माणासाठी पहिल्यांदा बनविलेली योजना पूर्ण होत नव्हती. छोट्या-छोट्या तुकड्यात हे काम करण्याचे नियोजन होते. परंतु एकदा काम सुरू केल्यानंतर मेगाब्लॉक घेतल्यामुळे गाड्या रद्द होऊन प्रवाशांना मनस्ताप होण्याची शक्यता होती. त्यामुळे रेल्वेने हे काम एकदाच करण्याचा निर्णय घेतला. यासाठीची इतर आवश्यक कामे सुरू केली आहे. इंजिनिअरिंगचा प्लॅन बनवला आहे. पुनर्निर्माणाचा भाग असलेल्या इलेक्ट्रिक इंटरलॉकिंगला मंजुरी मिळाली आहे. यासाठी इमारतीचे काम सुरू झाले असून पुननिर्माणाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. ही इमारत या वर्षात पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर कामाला गती दिली येईल.

पुणे रेल्वेस्थानकाच्या पुनर्निर्माणाच्या कामासाठी १६८ कोटी रुपये लागणार आहे. पहिल्यांदा यासाठीचे बजेट कमी होते. ते वाढवून घेण्यात आले आहे. यामध्ये दोन नवीन फलाट उभारले जाणार आहे. हे काम आता एकदा सुरू झाले असून ते संपल्यानंतरच थांबेल. लवकरच हे काम सुरू होणार आहे. - धर्मवीर मीना, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

Web Title: Pune Railway Station reconstruction work to begin soon Work on electric interlocking building begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.