Pune Rain: पुण्यातील रस्त्यावर बोटिंगचा आनंद! तरूणाचा व्हिडिओ होतोय व्हायरल
By श्रीकिशन काळे | Published: June 7, 2024 11:42 AM2024-06-07T11:42:00+5:302024-06-07T11:44:25+5:30
तरूणाने चक्क बोटिंगचा आनंद लुटताना एक व्हिडिओ शेअर केला आहे....
पुणे :पुणेकरांना आता दररोजच बोटिंगचा आनंद लुटता येणार आहे, तशी सोय वरूणराजाने केली आहे. कारण गेल्या दोन दिवसांत पुणेकरांवर एवढी कृपा झाली आहे की, रस्ते पाण्याखाली गेले आणि बोटिंग करता येईल, अशी परिथिती निर्माण झाली. म्हणूनच एका तरूणाने चक्क बोटिंगचा आनंद लुटताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.
माॅन्सून आता पुण्यात दाखल होत असून, त्यामुळे पुणेकरांना धडकी भरणार आहे. कारण पुण्यात जोरदार पाऊस होत आहे. दोन वर्षांपासून पुण्यात खूप पाऊस होत असल्याने रस्ते पाण्याखाली जात आहेत. त्यातच ढगफुटीसदृश्य पावसाचा फटका देखील पुण्याला बसत आहे. त्यामुळे एका पुणेकराने चक्क रस्त्यावर बोटिंगचा आनंद लुटला. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दोन दिवसांपुर्वी पद्मावती येथे एवढा पाऊस झाला की, दुचाकी देखील वाहत होती. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. यंदा तर शंभर टक्के पाऊस पुण्यात सांगितला आहे. त्यामुळे भविष्यात बोटिंगचा आनंद लुटता येईल, अशीच परिस्थिती आहे. पुण्यातील रस्त्यावरून पाणी जायला योग्य सोय केली नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
गेल्या वर्षी पुण्यात पुणे महापालिकेने बोट खरेदी देखील केली होती. त्या बोटींचा वापर यंदा करावा लागण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी पालिकेने यावर योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा पुणेकर बोटिंग करताना दिसले तर नवल वाटणार नाही.