Pune Rain: नीरा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे बारामती रस्त्यावरील वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:22 PM2022-10-12T12:22:56+5:302022-10-12T12:27:22+5:30

सातारा - नगर या मार्गावर दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा....

Pune Rain Heavy rain in Neera area; Baramati road traffic jammed | Pune Rain: नीरा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे बारामती रस्त्यावरील वाहतूक ठप्प

Pune Rain: नीरा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे बारामती रस्त्यावरील वाहतूक ठप्प

googlenewsNext

नीरा (पुणे) : नीरा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने सातारा - नगर व नीरा - बारामती रस्त्यावरील बुवासाहेब ओढ्याच्या पुलावरुन पुन्हा पाणी वाहिले आहे. काल मंगळवारी सायंकाळी नीरा परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यानंतर रात्री पावसाचे प्रमाण कमी झाले, तरी संततधार सुरूच होती. त्यामुळे राख, गुळूंचे या परिसरातील ओढ्यांतून पाणी वाहून ते पाणी बुवासाहेब ओढ्याला आले. रात्री बारानंतर या पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ठप्प होती. त्यामुळे नीरा - बारामती व सातारा - नगर या मार्गावर तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

गेल्या दीड वर्षांपासून नीरा शहरानजिक बारामती पुरंदरच्या शिवेवरील बुवासाहेब ओढ्याच्या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. हे काम सुरू असल्याने ठेकेदाराने ओढ्यातून फक्त तीन सिमेंटच्या नळ्या टाकून पुल तयार केला आहे. या पुलावरून मागील महिन्यात सलग चार दिवस पाणी वाहिले होते. त्यावेळी या पुलाचे नुकसान झाले होते. ठेकेदाराने पुन्हा फक्त मुरूम भरून तात्पुरती सोय केली होती. मात्र, मंगळवार रात्री झालेल्या पावसाने या पुलावरून पुन्हा पाणी वाहून गेले. त्यामुळे तो पुल प्रवाहाच्या दोन्ही बाजूने खचला आहे. आता या पुलावरून अवजड वाहतूक करणे धोकेदायक असल्याने हा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दुचाकी मात्र यावरून जात आहेत. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान-

सध्या शाळा महाविद्यालयांच्या परिक्षेचा हंगाम आहे. नीरा व पुरंदरच्या खेडेगावातून बारामतीच्या पूर्व भागातील शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांची दररोज येत असतात. शाळेच्या बस व शिक्षक मोठ्या प्रमाणावर या पुलावरून दररोज ये - जा करत असतात मागील महिन्यात सलग चार दिवस व आज पुन्हा ऐन परीक्षेच्या तोंडावर हा पुल बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

 वाहतुकीसाठी धोकादायक बनला रस्ता-

याबाबत शाळा प्रशासनाने मात्र कोणतीही कारणे चालणार नाही, शाळेत वेळेवर यावेच लागेल, असे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना फर्मान काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तब्बल बारा किलोमीटरचा वळसा घालून गुळूंचे - थोपटेवाडी या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. हा मार्गही वाहतुकीसाठी धोकादायक आहे.

Web Title: Pune Rain Heavy rain in Neera area; Baramati road traffic jammed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.