Pune Rain: पुण्यात २४ तासांत २४ पेक्षा अधिक झाडपडी; सोसाट्याचा वारा सुटल्याचा फटका
By नितीश गोवंडे | Updated: July 24, 2024 16:47 IST2024-07-24T16:45:49+5:302024-07-24T16:47:22+5:30
अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यांवर, वाहनांवर पडल्याने अग्निशामक विभागाची चांगलीच धावपळ झाली

Pune Rain: पुण्यात २४ तासांत २४ पेक्षा अधिक झाडपडी; सोसाट्याचा वारा सुटल्याचा फटका
पुणे: शहरात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वेगवेगळ्या भागांमध्ये झाडपडीच्या २४ घटना घडल्या. अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मंगळवार (दि. २३) सकाळी १० ते बुधवार (दि. २४) सकाळी १० या दरम्यान याची नाेंद झाली आहे. झाडपडीच्या या घटनांत अनेक चारचाकींचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
जिल्ह्यासह शहरात खडकवासला, धायरी, औंध, कोथरूड, वारजे, शिवाजीनगर, कात्रज, बालेवाडी आणि कोरेगाव पार्क परिसरात मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. त्याचदरम्यान काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यांवर, वाहनांवर पडल्या. यामुळे अग्निशामक विभागाची चांगलीच धावपळ झाली.
या भागात घडली झाडपडी
अनंत पार्क - औंध, नवनाथ मित्र मंडळ - एरंडवणा, ठाकूर बेकरी - महर्षी नगर, म्हात्रे पुलाजवळ - नवीपेठ, महंमदवाडी रस्ता - वानवडी, सुभाषनगर - शुक्रवार पेठ, दीनदयाळ हॉस्पिटल - एफसी रोड, जांभूळवाडी रस्ता, होले वस्ती - उंड्री, फातीमानगर, प्रथमेश पार्क -बालेवाडी, डहाणूकर कॉलनी - कोथरूड, वनाज कंपनी जवळ - कोथरूड, मंगलदास रस्ता, खडकमाळ आळी, क्वीन्स गार्डन, मीनाताई ठाकरे वसाहत - गुलटेकडी, विमाननगर, कळस गावठाण, दीनानाथ रुग्णालय - एरंडवणा, बाजीराव रस्ता, उत्सव हॉटेल -सिटीप्राईड, आयटीआय रस्ता - औंध, हॅप्पी कॉलनी - कोथरूड येथे झाडपडीच्या घटना घडल्या.