Pune Rain: पावसाने पुणे शहराला झोडपले, मान्सूनचे आगमन; रस्त्याला नद्यांचे स्वरूप, पाहा VIDEO
By श्रीकिशन काळे | Published: June 8, 2024 05:29 PM2024-06-08T17:29:41+5:302024-06-08T17:30:28+5:30
गेल्या दोन दिवसांपासून माॅन्सून दक्षिण कोकणात मुक्कामी होता. आज शनिवारी मात्र पोषक वातावरण तयार असल्याने पुणे जिल्ह्यित पावसाने मजल मारली आहे...
पुणे : जोरदार सरी आणि विजांच्या कडकडाटासह पुणेकरांना वरूणराजाने शनिवारी (दि.८) चांगलेच झोडपले. माॅन्सूनने पुणे जिल्ह्यात प्रवेश केला असून, राज्यातही पुढील दोन दिवसांत मजल मारणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
गेल्या दोन दिवसांपासून माॅन्सून दक्षिण कोकणात मुक्कामी होता. आज शनिवारी मात्र पोषक वातावरण तयार असल्याने पुणे जिल्ह्यित पावसाने मजल मारली आहे. त्यामुळेच पुण्यात सायंकाळनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर चांगलाच असल्याने रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पाण्याचा प्रवाह सर्वत्र वाहत असून, आकाश भरून आले आहे. सकाळपासून उकाडा जाणवत होता. सायंकाळी ५ नंतर मात्र आकाशात ढगांची दाटी झाली आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला.
पुढील दोन दिवसांत माॅन्सून इतर भागात धडक मारेल आणि राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
Pune Rain: पुण्यात पावसाचे जोरदार आगमन, शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप#punerain#monsoon
— Lokmat (@lokmat) June 8, 2024
(व्हिडिओ- दिपक होमकर) pic.twitter.com/f1pBN0mw4t