ग्रँड चॅलेंज स्पर्धेत पुणे शहराची निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 09:44 PM2018-06-14T21:44:50+5:302018-06-14T21:44:50+5:30

निती आयोग आणि रॉकी माउंटन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या ग्रँड चॅलेंज स्पर्धेत पुणे शहराची पहिल्या क्रमांकावर निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने शहराला चलनवलन क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

Pune rank first in Grand Challenge competition | ग्रँड चॅलेंज स्पर्धेत पुणे शहराची निवड 

ग्रँड चॅलेंज स्पर्धेत पुणे शहराची निवड 

Next

पुणे :निती आयोग आणि रॉकी माउंटन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या ग्रँड चॅलेंज स्पर्धेत पुणे शहराची पहिल्या क्रमांकावर निवड करण्यात आली आहे. या निमित्ताने शहराला चलनवलन क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

    देशभरातील अनेक शहरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यात स्थानिक शासनाचा बळकट पाठिंबा, चलनवलन प्रगतीचा पारदर्शक आणि स्वच्छ अहवाल, भारताच्या शहरी जनजीवनात असलेले संबंधित शहराचे महत्व आदी निकष वापरण्यात आले आहेत.या निवडीनंतर पुण्यामध्ये शहर चलनवलन प्रयोगशाळा या कार्यशाळेचे आयोजन  होणार आहे.या कार्यशाळेत पुणे आणि भारतातील चलनवलन व्यवस्थेमधील अतिमहत्वाच्या समस्यांवर प्रभावी आणि प्रयोगशील काम करणाऱ्या व्यक्ती एकत्र येणार आहेत. या कार्यशाळेत शोधले गेलेले उपाय राष्ट्रीय पातळीवर 'ग्रीन मोबिलिटी स्कीम' अशा उपक्रमांमध्ये वापरता यावेत या उद्देशाने निर्माण झालेले असतील. 

महापालिकेचे प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला यांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून या अंतर्गत शहराच्या चलनवलन क्षेत्रात फायदा होईल अशा संकल्पना समोर येण्याची आशा व्यक्त केली. यात निती आयोगाचा समावेश समावेश असल्याने गरज पडल्यास धोरणात बदल करणेही शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

Web Title: Pune rank first in Grand Challenge competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.