पुणे : रवी पुजारीच्या हस्तकाला पिस्तूलासह अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 02:58 PM2018-02-20T14:58:09+5:302018-02-20T14:59:13+5:30
कुख्यात गुंड रवी पुजारी याचा हस्तक निलेश भरम याला दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले. त्याच्याकडून 1 गावठी पिस्तुल, 7 काडतुसे, कार असा 5लाख 41हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
पुणे : कुख्यात गुंड रवी पुजारी याचा हस्तक निलेश भरम याला दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले. त्याच्याकडून 1 गावठी पिस्तुल, 7 काडतुसे, कार असा 5लाख 41हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. दरोडा प्रतिबंधक पथकातील पोलीस नाईक परवेज जमादार यांना मिळालेल्या माहितीनुसार, दरोडा प्रतिबंधक पथकाने के. के. मार्केटजवळ सोमवारी (19 फेब्रुवारी) संध्याकाळी सापळा रचला. मोटारीतून आलेल्या भरमला पकडून त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे 1 गावठी पिस्तुल व 7 काडतुसे मिळाली. भरम हा रवी पूजारी टोळीशी संबंधित आहे. त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, दरोडा, अशा प्रकारचे 8 गुन्हे दाखल आहेत. तो नुकताच मोक्का च्या गुन्ह्यातुन जामिनावर सुटला होता.
पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, कर्मचारी परवेज जमादार, विनायक पवार, राहुल घाडगे आदींनी ही कामगिरी केली.