पुण्यात हंगामातील सर्वात कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, जळगाव, नाशिकमध्येही गारवा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 10:30 AM2021-02-09T10:30:14+5:302021-02-09T10:30:28+5:30
Maharashtra weather report : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून जळगाव येथे सर्वात कमी किमान तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून जळगाव येथे सर्वात कमी किमान तापमान ७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. नाशिक, पुणे, बारामती येथे या हंगामातील सर्वात कमी तापमानाची मंगळवारी सकाळी नोंद झाली आहे. राज्यातील अनेक शहरामधील किमान तापमान एक अंकापर्यंत खाली घसरले आहेत.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान : जळगाव ७, सातारा १०.७, नाशिक ९.१, बारामती ८.८, पुणे ८.६, महाबळेश्वर १२.७, सांगली १३.९, जेऊर ९, मालेगाव १०.४, सांताक्रुझ १७.६, डहाणणु १७.१, ठाणे २०.२, औरंगाबाद १०.७, जालना १४, परभणी ९.९, उस्मानाबाद १२.४, नांदेड १०.७, अकोला १०.५, अमरावती १०.४, बुलढाणा ११.८, ब्रम्हपुरी १०.८, चंद्रपूर ११.४, गडचिरोली १०, गोंदिया ९.६, नागपूर १०.६, वर्धा ११, वाशिम १०.४, यवतमाळ १०.