पुण्यात नव्या वर्षात सर्वात निच्चांकी किमान तापमानाची नोंद, ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 02:26 PM2021-02-08T14:26:57+5:302021-02-08T14:28:45+5:30
Pune Temperature : नव्या वर्षातील सर्वात निच्चांकी किमान तापमानाची नोंद आज राज्यातील अनेक शहरात नोंदविण्यात आली. नाशिक ९.२, पुणे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे.
पुणे - नव्या वर्षातील सर्वात निच्चांकी किमान तापमानाची नोंद आज राज्यातील अनेक शहरात नोंदविण्यात आली. नाशिक ९.२, पुणे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे. या हंगामातील तिसरे सर्वात कमी किमान तापमान पुण्यात नोंदविले गेले आहे.
पुणे शहरात डिसेंबर महिन्यांच्या अखेरीस या हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात २२ डिसेंबर रोजी ८.८ अंश आणि २१ डिसेंबर रोजी ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर किमान तापमानात वाढ होत गेली होती.
जानेवारी महिना हा गेल्या ४ दशकातील सर्वात उबदार महिना ठरला होता. फेब्रुवारी महिन्यात आता किमान तापमानात घट आढळून आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील किमान तापमानात चढउतार होत होता. ५ फेब्रुवारीला १२.१, ६ फेब्रुवारी रोजी ११.३ आणि ७ फेब्रुवारीला १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात आज आणखी घट होऊन किमान तापमान सिंगल डिजिट म्हणजे ९.६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. पाषाण येथे ११.१ आणि लोहगाव १२.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान : बारामती १०़१, सातारा १४, महाबळेश्वर १२़४, नाशिक ९़२, जेऊर १०, परभणी ११़३, नांदेड १२़३, औरंगाबाद १०़५, जालना १२़४, सांताक्रुझ १८, मुंबई २१़२, ठाणे १९, डहाणु १६़९, माथेरान १७़८, अकोला १०़८, अमरावती ११़२, बुलढाणा १३़३, ब्रम्हपुरी १०़३, चंद्रपूर ११़२, गडचिरोली १०़६, गोंदिया १०़५, नागपूर ९़४, वर्धा १०़९, वाशिम १६़८, यवतमाळ १३