पुण्यात हंगामातील निचांकी तापमानाची नोंद; शहराचं किमान तापमान ९.२ अंश सेल्सिअस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 10:45 AM2020-12-21T10:45:58+5:302020-12-21T10:47:40+5:30
तापमानात घसरण झाल्यानं पुणेकरांना हुडहुडी
पुणे : उत्तरेकडील थंड वाºयांचा प्रभाव आता पश्चिम महाराष्ट्रातही जाणवू लागला असून सोमवारी सकाळी पुण्यात या हंगामातील सर्वात निचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी शिवाजीनगर येथे ९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पाषाण येथे १० आणि लोहगाव येथे ११.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे़ आज राजगुरुनगर ९.१ आणि तळेगाव येथे १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
यापूर्वी या हंगामात पुण्यात १२ नोव्हेंबर रोजी पुणे ९.८, पाषाण ११ आणि लोहगाव येथे १२.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तापमानात मोठी वाढ होऊन काही ठिकाणी पाऊसही झाला होता.
उत्तरेकडील थंड वार्यांचा प्रभाव राज्यात वाढू लागला असून विदर्भ गारठला आहे. गोंदिया आणि यवतमाळ येथे सर्वात कमी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला ९.६, नागपूर ८.४, वर्धा ९.८, वाशिम १०, मालेगाव ११.२, शिंदेवाही ९.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.